Pune Bribe पुणे, ता. 25 : बांधकाम व्यावसायिकाला भूजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी अडीज लाखांची लाच मागून दोन लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठ भूवैज्ञानिक व कनिष्ठ भूवैज्ञानिकाला शुक्रवारी (ता. 24) रंगेहाथ पकडले आहे. दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Bribe

दिवाकर नामदेव धोटे (वय 53, पद- वरिष्ठ भूवैज्ञानिक, नेमणूक वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग, शिवाजी नगर पुणे रा.ठी. रूम नंबर 902, संकेश्वर रॉयल सोसायटी जाधव वाडी, चिखली, पुणे (वर्ग 1) आणि प्रियंका संदीपान घुले (वय 39, पद कनिष्ठ भूवैज्ञानिक, नेमणूक वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग, शिवाजी नगर पुणे रा. कुमार प्रिन्स विल्हे, जाधव वाडी, मोशी पुणे, नेमणूक भूजल सर्वेक्षण विभाग, शिवाजी नगर पुणे. (वर्ग 2) वरिष्ठ भूवैज्ञानिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका 46 वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. Pune Bribe

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असुन त्यांचे इमारतीच्या बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मिळणेकामी पीएमआरडीएकडे अर्ज केला होता. पीएमआरडीएने भुजल सर्वेक्षण अहवाल सादर करणेबाबत कळविले. म्हणून तक्रारदार यांनी भूजल सर्वेक्षण अहवाल मिळण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभाग पुणे यांना अर्ज केला असता, सदर भुजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी लोकसेवक घुले यांनी लोकसेवक घोटे यांच्यासाठी 2 लाख 50 हजार रुपये लाच मागणी केली म्हणून तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाकडे तक्रार केली होती. Pune Bribe
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, लोकसेवक घुले यांनी लोकसेवक धोटे यांना भेटून बोलण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे धोटे यांना भेटले असता त्यांनी पंचासमक्ष तडजोडी अंती 2 लाख स्विकारण्याचे मान्य करून सदर लाचेची रक्कम घुले मॅडम यांच्याकडे देण्यास सांगितले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. Pune Bribe
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयात शुक्रवारी (ता.24) सापळा रचला. तेव्हा लोकसेविका प्रियंका घुले यांना तक्रारदार यांच्याकडून 2 लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. तसेच लोकसेवक दिवाकर घोटे यांना देखील त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे करत आहेत. Pune Bribe







