Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Model Death Case: चेहऱ्यावर डाग, शरीरावर जखमा ; डायमंड गर्ल ‘लव्ह जिहाद’ची शिकार? प्रियकर रुग्णालयातून फरार अन् पुढे…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 November 2025, 20:29
Model Death Case: Scars on face, wounds on body; Diamond Girl a victim of 'love jihad'? Boyfriend absconded from hospital and then...

photo -social media

Model Death Case : भोपाळमध्ये एका प्रसिद्ध मॉडेलच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण शहर हादरले आहे. मृत महिलेचं नाव खुशबू अहिरवार असं असून ती सोशल मीडियावर ‘डायमंड गर्ल’ या नावाने ओळखली जायची. खुशबूच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा प्रियकर कासिम याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कासिमने खुशबूला रुग्णालयात सोडलं आणि त्यानंतर तो फरार झाला. ही घटना इंदौर रोडवरील भैंसाखेडी परिसरात घडली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

खुशबूच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या असून, विशेषतः तिच्या चेहऱ्यावर, खांद्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर जखमेचे निशाण असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन गांधी मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात या प्रकरणामागे प्रेमसंबंधातील वादाचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरोपी कासिम हा उज्जैनचा रहिवासी असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

खुशबू सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय होती. तिच्या इंस्टाग्रामवर जवळपास 12 हजार फॉलोअर्स होते. ती कासिमसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिचं मूळ नाव खुशी वर्मा असून ‘डायमंड गर्ल’ या नावाने ती मॉडेलिंग क्षेत्रात ओळखली जायची. खुशबूने बीएच्या पहिल्या वर्षानंतर शिक्षण सोडलं आणि मागील तीन वर्षांपासून ती भोपाळमध्ये राहत होती. ती स्थानिक बँड्ससाठी मॉडलिंग करत होती आणि पार्ट-टाइम जॉब करून स्वतःचा खर्च भागवत होती.

खुशबूच्या आई लक्ष्मी अहिरवार यांनी सांगितलं की, तीन दिवसांपूर्वी कासिमने त्यांना फोन करून सांगितलं होतं की तो मुस्लिम आहे, पण खुशबू त्याच्यासोबत सुरक्षित आहे आणि ते दोघं उज्जैनला जात आहेत. मुलीनेही आईला खात्री दिली होती की, कासिम चांगला मुलगा आहे आणि ती त्याच्यासोबत सुखात आहे. मात्र, काही दिवसांतच खुशबूच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आहे. कासिमच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. प्राथमिक तपासात ही घटना ‘लव्ह जिहाद’शी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पोलिसांनी अधिकृतपणे याबाबत काहीही सांगितलेले नाही. या प्रकरणाने भोपाळमध्ये खळबळ उडाली असून सर्वांचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07

सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी! पळसदेवमध्ये जुन्या वादातून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Wednesday, 1 April 2026, 11:03
Next Post

Delhi Blast: राजधानी दिल्लीत भीषण स्फोट; पहा Photo 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.