Maval Crime News : तळेगाव दाभाडे (पुणे) : जमिनीचे वाटप आणि पाइपलाइनच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशांच्या वादातून सख्ख्या पुतण्याने चुलत्यावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना मावळ तालुक्यातील जाधववाडी येथे घडली आहे. रविवारी (ता. 26) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. Maval Crime News

रवींद्र रमाकांत जाधव (वय-45, रा. जाधववाडी, ता. मावळ) असे खून झालेल्या चुलत्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रप्रकरणी त्यांचा पुतण्या विशाल सुखदेव जाधव याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. Maval Crime News
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबाची जाधववाडी येथे १ एकर ९ गुंठे जमीन आहे. या जमिनीच्या वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून काका-पुतण्यामध्ये धुसफूस सुरू होती. दरम्यान, एमएसआरडीसीची (MSRDC) पाइपलाइन या शेतातून गेल्यामुळे कुटुंबाला प्रशासनाकडून ५ लाख रुपयांचा मोबदला मिळाला होता. या पैशांच्या वाटपावरूनही त्यांच्यात तीव्र मतभेद होते. Maval Crime News
रवींद्र जाधव हे आपल्या आईसोबत जाधववाडी येथे राहत होते. रविवारी रात्री याच जुन्या वादावरून काका-पुतण्यामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी झाली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि संतापलेल्या विशालने कोयत्याने रवींद्र यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात रवींद्र हे गंभीर जखमी झाले आणि जागीच कोसळले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. Maval Crime News
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मुख्य आरोपी विशाल जाधव आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे जाधववाडी परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. Maval Crime News







