Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत पोलिसांची मोठी कारवाई: मोक्का आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Sunday, 20 September 2026, 0:14

यवत : पुणे-सोलापूर महामार्गाजवळील बोरीभडक गावाच्या हद्दीत अवैध शस्त्रांसह फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या ताब्यातून एक बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस, असा एकूण 25,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 तारखेला रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास बोरीभडक परिसरात एक तरुण विनापरवाना शस्त्र घेऊन वावरत असल्याची पक्की बातमी पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन सापळा रचला. पोलिसांनी संशयित आरोपी ऋषभ रमेश बडेकर (वय 30, रा. बडेकरवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आणि जिवंत गोळी आढळून आली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीरपणे हत्यार बाळगल्यामुळे आरोपीविरोधात यवत पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अंमलदार धीरज जाधव यांनी याबाबत तक्रार दिली असून, पोलीस हवालदार रॉकी देवकाते हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आरोपी ऋषभ बडेकर हा मोक्का आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला असून, यापूर्वी पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्याच्यावर 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये यवतचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, तसेच हवालदार रॉकी देवकाते, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, धीरज जाधव, मारुती बाराते, अमोल भुजबळ, प्रतीक जगताप, सचिन गुंड, दिनेश लोणकर आणि विनीत कुऱ्हाडे यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी आणि बेकायदेशीर शस्त्रांचा वावर खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात उष्णतेचा कडाका वाढल्यानंतर हवामानात अचानक बदल; पुढील २ दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Sunday, 20 September 2026, 22:57

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या अर्ज मुदतीत वाढ; आता २६ नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सोडत

Sunday, 20 September 2026, 22:08

छत्रपती संभाजीनगरहून पुण्यात अवघ्या अर्ध्या तासात! मराठवाड्यातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर; IndiGo कडून विशेष भाडे योजना जाहीर

Sunday, 20 September 2026, 21:21

साताऱ्यात जमिनीच्या वादातून रक्ताचा सडा! भावकीतील २८ वर्षीय युवकाची दांडक्याने बेदम मारहाण करून हत्या

Sunday, 20 September 2026, 20:38

कोथरूड ते पाषाण प्रवास आता अवघ्या १०-१५ मिनिटांत! बोगद्याच्या आराखड्यात मोठा बदल करत महापालिकेचा मास्टरप्लॅन

Sunday, 20 September 2026, 19:57

मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी बहुप्रतिक्षित रेल्वे सुरू! उद्यापासून नियमित फेऱ्या; वाचा वेळापत्रक

Sunday, 20 September 2026, 19:09
Next Post

गणेशोत्सवात ग्रहांची चाल बदलणार! 'या' राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक लाभासह नशिबाची साथ, वाचा राशिभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp