Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Immoral Love : ७ मुलांची आई ३ मुले असलेल्या बापाच्या प्रेमात पडली ; अनोख्या प्रेम प्रकरणामुळे १० मुलं आली उघड्यावर…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 15 May 2023, 17:37

जालना- Immoral Love : अनैतिक प्रेमात (Immoral Love) अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच तलवारीने वार करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Immoral Love) या प्रकाराने जालना जिल्ह्यात घडली आहे. (Immoral Love) या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत पत्नीला बेड्या ठोकल्या. (Immoral Love)

सात मुलांच्या आईचं तीन मुलांच्या बापाशी सूत जुळलं. पण या प्रेमप्रकरणाचा धक्कादायक शेवट झाला. यात निर्दोश सात मुलं उघड्यावर आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. जालना शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या म्हाडा कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली.

एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी काहाणी…असा रचला कट

म्हाडा कॉलनित राहाणाऱ्या प्रमोद झिने या व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रमोद झिने एका खासगी क्षेत्रात काम करत होता. प्रमोद रात्री कामावरुन घरी आला पण सकाळी घराच्या अंगणात त्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पतीची हत्या झाल्याची तक्रार प्रमोदच्या पत्नीने पोलीस स्थानकात केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

आपल्या पतीचे एका महिलेसमोबत प्रेमप्रकरण होते, तीनेच ही हत्या घडवून आणल्याचा आरोप प्रमोदच्या पत्नीने केला. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला. प्रमोदच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जालना जिल्ह्यातल्या वाळूज परिसरातून त्या महिलेला ताब्यात घेतलं. तिच्याकडे चौकशी केली असता आपले प्रेमसंबंध तुटले असून गेले सहा महिने आपण एकमेकांना भेटलो नसल्याचं तीने सांगितलं.

 

त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा पुन्हा प्रमोद राहात असलेल्या परिसरात वळवला. प्रमोदच्या घराच्या आसपासच्या लोकांकडे चौकशी केली पण त्या रात्री कोणी अज्ञात व्यक्ती परिसरात पाहिला नसल्याचं शेजारच्यांनी सांगितलं. पण शेजारच्या काही लोकांनी दिलेल्या एका मुद्द्यावर पोलिसांना वेगळाच संशय आला.

‘त्या’ रात्री कुत्रा भूंकलाच नाही

घटनेच्या दिवशी प्रमोद झिने हा रात्री दारू पिऊन घरी आला होता. त्यानंतर तो घराच्या अंगणातच बाज टाकून झोपला. त्यांच्या घरात एक पाळिव श्वान होता. पण ज्या रात्री प्रमोदचा खून झाला त्या रात्री त्यांच्या श्वान भूंकला नाही, अज्ञात व्यक्ती घराजवळ आला असता तर तो श्वान भूंकला असता, अशी माहिती शेजारच्यांनी दिली. त्यामुळे प्रमोदची हत्या त्याच्या घरातल्यांनीच केली असल्याचं स्पष्ट झालं.

घरात लहान मुलं आणि पत्नी होती. लहान मुलं बापाची हत्या करु शकत नाही, त्यामुळे पोलिसांनी प्रमोदची पत्नी आशा झिने हिला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तीने आपण हा खून केला नसल्याचं सांगितलं. पण पोलिसी खाक्या दाखवताच तीने प्रमोदच्या हत्येची कबूली दिली.

प्रमोद झिने आणि आशाचं 20 वर्षांपूर्वी लग्न झालं. त्यांना सात मुलं आहेत. यात सहा मुली तर एक मुलगा आहे. आशा हिचं रेवगाव इथं राहाणाऱ्या रुपेश शिंदे नावाच्या व्यक्तीशी सूत जुळलं होतं. रुपेश शिंदेला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुलं आहेत. रुपेश हा मोलमजुरीची कामं करतो. आशा आणि रुपेशच्या प्रेमात प्रमोद अडसर ठरत होता. त्यामुळे त्या दोघांनी मिळून प्रमोदचा काटा काढण्याचा कट रचला.

घटनेच्या दिवसी सकाळी रुपेशने धारदार तलवार आणून आशा दिली होती. तीने ती घरात लपवून ठेवली. रात्री प्रमोदा कामावरून येतानाच पिऊन घरी आला. गरम होत असल्याने त्याने घराच्या अंगणात बाज टाकली आणि तिथेच झोपी गेला. दारुच्या नशेत असल्याने आशाचं काम आणखी सोप झालं होतं. प्रमोद झोपेत असतानाच आशाने तलवारीने त्याच्यावर वार केले. यात प्रमोदचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आशाने त्याच्या हातातलं कडं, गळ्यातील चेन रुपेशला नेऊन दिली आणि पुन्हा घरी येऊन झोपली. सकाळी प्रमोदचा मृतदेह पाहून तीने आरडा ओरडा केला आणि पोलिसांत तक्रार दिली. पण तिचं हे नाटक फार काळ टिकू शकलं नाही.

प्रमोदच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी आशा झिने आणि रुपेश शिंदेला अटक केली आहे. पण या अनैतिक संबंधात निष्पाप मुलांना मात्र नाहक शिक्षा भोगावी लागतेय. प्रमोद-आशा झिनेची सात मुलं आणि रुपेश शिंदेला अटक झाल्याने त्याची तीन अशी दहा मुलं आता उघड्यावर आली आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Suicide | उरुळी कांचन येथे ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

 

Pune : मित्राला उसने दिलेले पैसे परत न दिल्याने वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने वसतिगृहात घेतला गळफास, पुण्यातील घटना..

Pune Crime : चोरट्यांचा मोर्चा आता एसटी बसकडे ; स्वारगेट बस स्थानकात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिप्लाला FDAचा मोठा दणका! पुण्यातील वडकी गोदामाचा औषध विक्री परवाना थेट रद्द,

Friday, 2 October 2026, 19:07

पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट!पप्या शिंदेच तपासात असहकार्य; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी

Friday, 2 October 2026, 18:27

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16
Next Post

Honey Trap : Indian Air Force चा अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात ? ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर चौकशीतून धक्कादायक माहिती आली समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp