Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जप्रकरणाला नवे वळण! सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून प्रवेश; एकावर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 12 May 2026, 19:31

Loni Kalbhor  लोणी काळभोर, ता. १२ : तब्बल ७५ लाखांच्या स्थावर तारण कर्जप्रकरणात लोणी काळभोर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. थकबाकीमुळे प्रशासनाच्या आदेशानुसार सील करण्यात आलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून कर्जदारानेच पुन्हा अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संबंधित पतसंस्थेने थेट पोलिसांत धाव घेतली असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor

डॅनिअल दिनकर पवार (रा. होरेबनगर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका प्रतिभा राहुल तुपे (वय ४६, रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, सहकारी पतसंस्थांच्या वसुली प्रक्रियेत अशा प्रकारे कायद्याला आव्हान देण्याच्या घटनांमुळे प्रशासन आणि वित्तीय संस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Loni Kalbhor

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॅनिअल पवार यांनी ३ जुलै २०१५ रोजी त्यांच्या मालकीच्या मालमत्तेवर तारण ठेवून घरदुरुस्ती आणि घरबांधणीसाठी २५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर आणखी दोन कर्जे मंजूर करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ७५ लाखांचे स्थावर तारण कर्ज पतसंस्थेकडून वितरित करण्यात आले होते.मात्र, कालांतराने कर्जाची मोठी थकबाकी निर्माण झाली. पतसंस्थेकडून वारंवार नोटिसा देऊनही कर्जदारांनी रक्कम न भरल्याने अखेर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. Loni Kalbhor

जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी पुणे तसेच अप्पर तहसीलदार लोणी काळभोर यांच्या आदेशानुसार पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात संबंधित मालमत्तेचा ताबा घेतला. २१ जुलै २०२५ रोजी अधिकृत कारवाई करून मालमत्तेला कुलूप लावून सील करण्यात आले होते. या कारवाईवेळी विशेष वसुली अधिकारी, पतसंस्थेचे प्रतिनिधी आणि लोणी काळभोर पोलिस उपस्थित होते. प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेनुसार ताबा घेतल्याने हे प्रकरण त्या वेळी चर्चेत आले होते. Loni Kalbhor

दरम्यान, काही दिवसांनी संबंधित कर्जदार डॅनिअल पवार यांनी कोणतीही लेखी परवानगी न घेता मालमत्तेचे सील आणि कुलूप तोडून पुन्हा त्या ठिकाणी प्रवेश केल्याचे समोर आले. ३० जुलै रोजी हा प्रकार पतसंस्थेच्या निदर्शनास आला. यानंतर पतसंस्थेकडून त्यांना वारंवार ताबा सोडण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांनी आदेशांकडे दुर्लक्ष करत मालमत्ता रिकामी करण्यास नकार दिल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी डॅनिअल दिनकर पवार यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२९(३) आणि ३२९(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. Loni Kalbhor

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14

केसनंदमध्ये बिगर शेती परवान्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 35 लाखांची फसवणूक; वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 6 June 2026, 18:30
Next Post

Baramati Plane Crash : बारामतीत पुन्हा विमानाचा भीषण अपघात; तांत्रिक बिघाडामुळे विमान जमिनीवर कोसळले ; 28 जानेवारीच्या 'त्या' काळ्या आठवणी पुन्हा ताज्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.