Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यात दुसऱ्या कारवाईत टाकळी हाजी येथे लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; ९५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 1 October 2026, 12:14

शिरूर : तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी 95 हजार रुपये स्वीकारताना शिरूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत टाकळी हाजी पोलीस चौकीच्या पोलीस हवालदाराला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.ही कारवाई मंगळवारी (ता.30) टाकळी हाजी पोलीस चौकी येथे करण्यात आली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सतीश नाथाराव मुंढे (वय ४५, पोलीस हवालदार,शिरूर पोलीस ठाणे,पुणे ग्रामीण) असे कारवाई करण्यात आलेल्या पोलीस आरोपीचे नाव आहे. तक्रारदार (वय ५९) यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सतीश मुंढे यांच्याकडे होता. या प्रकरणात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी लोकसेवक सतीश मुंढे यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता.याबाबत तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने मंगळवारी (ता.३०) टाकळी हाजी पोलीस चौकी येथे सापळा रचला. यावेळी तडजोडीनंतर ९५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस हवालदार सतीश मुंढे यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. कारवाईनंतर आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांच्या अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार सतीश मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये लाचलचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग घेतला होता.

नागरिकांना एसीबीचे आवाहन

कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी किंवा कामात मदत करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सतीश वाळके यांनी केले आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इंदापुरात तरुणीचा कारमधून पाठलाग; नंबर, सोशल मीडिया आयडी मागितल्याचा आरोप

Sunday, 25 October 2026, 16:28

केडगाव येथे तोतया पोलिसांचा वृद्धाला तब्बल अडीच लाखांचा गंडा! ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत सोन्याची चैन व दोन अंगठ्या हातचलाखीने लंपास

Sunday, 25 October 2026, 16:06

ST कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधी पगार होणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…

Sunday, 25 October 2026, 16:03

भर मंडपात रक्तरंजित सूड! नवरदेव आणि नातेवाईकांवर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; प्रेमविवाहातून पेटला वाद!

Sunday, 25 October 2026, 15:59

पुण्यातील भयंकर प्रकार! चालू गाडीतच आला हार्ट अटॅक; गाडीचा ताबा सुटला अन् कार थेट दुचाकींना धडकून टपरीवर आदळली…

Sunday, 25 October 2026, 15:55

प्रवाशांनो समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? थांबा! महामार्गावर उद्यापासून 12 दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 25 October 2026, 15:48
Next Post

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp