Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 1 October 2026, 12:16

लोणी काळभोर, ता.1 : ड्युटीनिमित्त सिमला येथे असलेल्या आर्मी जवानाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजार रुपयांची रोकड असा सुमारे 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मोगले वस्ती परिसरात घडली असून 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याप्रकरणी आर्मी जवान गुंडू शाहूराज पवार (वय 40, रा. मोगले वस्ती, पोल्ट्री फार्मजवळ, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 305,331(1),331(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे आर्मीमध्ये हवालदार पदावर कार्यरत असून सध्या कुटुंबासह जम्मू-काश्मीर बटालियन क्रमांक 1, सिमला येथे कार्यरत आहेत. पवार यांनी सन 2020 मध्ये मोगले वस्ती येथे दोन मजली इमारत बांधली आहे. वरच्या मजल्यावर ते कुटुंबासह राहतात, तर तळमजला भाड्याने दिलेला आहे. ड्युटीवर गेल्यानंतर वरचा मजला बंद असतो.

26 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील अडीच वर्षांचे बालक खेळता खेळता पवार यांच्या अंगणात गेले होते. मुलाला घेण्यासाठी त्याची आई पुष्पलता जाधव घराच्या अंगणात गेली असता तिला लोखंडी गेटची कडी तुटलेली आणि दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसले. तिने ही माहिती पती अविनाश जाधव यांना दिली. त्यानंतर जाधव यांनी तातडीने पवार यांना फोन करून घरफोडीची माहिती दिली. त्यावेळी पवार सिमला येथे ड्युटीवर होते. त्यांनी ही माहिती आपल्या वडिलांना दिल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी लोणी काळभोर येथे पोहोचले.

पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरफोडीची माहिती देऊन रजा घेतली आणि 28 सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास ते घरी पोहोचले. घराची पाहणी केली असता लोखंडी गेट, आतील दरवाजाचे कडी-कोयंडे आणि कुलपे तोडलेली आढळली. घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप लोखंडी कुदळीने वाकवून तोडण्यात आले होते. कपाटातील कपडे व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. कपाटात ठेवलेल्या दागिन्यांची आणि पैशांची पाहणी केली असता 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 1 ग्रॅम वजनाच्या लहान मुलाच्या कानातील दोन काड्या आणि 20 हजार रुपये रोख असा मुद्देमाल गायब असल्याचे निदर्शनास आले.

 

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी 15 सप्टेंबर रोजी दुपारी एक ते 26 सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून कुलूप तोडले आणि घरात प्रवेश करून कपाटातील दागिने व रोकड चोरून नेली. अशी फिर्याद पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बंद घराची रेकी करून चोरी करण्यात आली की चोरट्यांनी संधी साधली, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात ट्विस्ट! महिला कनेक्शन उघड, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी उचललं

Thursday, 1 October 2026, 12:52

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

Thursday, 1 October 2026, 12:34

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

Thursday, 1 October 2026, 12:16

शिरूर तालुक्यात दुसऱ्या कारवाईत टाकळी हाजी येथे लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; ९५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Thursday, 1 October 2026, 12:14

थेऊरमध्ये जागेच्या वादातून नातवाकडून आजोबांना मारहाण; जीवे मारण्याची धमकी

Thursday, 1 October 2026, 12:10

तुमचं SBI अकाउंट, LPG कनेक्शन अन् NPS असेल तर लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून बदलले ‘हे’ नियम

Thursday, 1 October 2026, 12:00
Next Post

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp