Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आज तुझा गेम वाजवून टाकणार!’ म्हणत तरुणाला अडवले; धारदार हत्याराने हल्ल्याचा प्रयत्न, मांजरीत टोळक्यावर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 August 2026, 11:10

लोणी काळभोर : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून 18 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत धारदार लोखंडी हत्याराने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मांजरी बुद्रुक (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत 25 ऑगस्ट रोजी रात्री बारा सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकरणी समर्थ हनुमंत क्षीरसागर (वय 18 , रा. सटवाई नगर, मांजरी बु.) याने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ आण्णा नेटके, विशाल दयानंद तोरणे, दत्ता महादेव झेंडे, यश बाळासाहेब भगत, स्वराज सत्यवान अडसुळ, रिहान बबलू सय्यद व इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी समर्थचा मित्र युवराज भोसले याचे वडील तानाजी भोसले यांना सौरभ आण्णा नेटके याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यावेळी समर्थ आणि युवराज यांनी घटनास्थळी जाऊन तानाजी भोसले यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा राग सौरभच्या मनात राहिला. त्याने समर्थला ‘तुला मी बघून घेतो’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा करून वाद मिटविण्यात आला होता. मात्र, तरीही सौरभ वेळोवेळी भेटेल तिथे ‘तुला सोडणार नाही, तुला मारणारच’ अशी धमकी देत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

समर्थ घरी झोपलेला असताना त्याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर याचा फोन आला. ‘सौरभ आण्णा नेटके आणि त्याच्यासोबतचे काही जण तुला मारण्यासाठी घरी येणार आहेत, तू घरी थांबू नकोस,’ असे भावाने सांगितल्याचे समर्थने फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या समर्थने घर सोडून मित्र युवराज भोसले याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, मांजराई देवी मंदिराशेजारील रस्त्यावर रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास त्याला संबंधितांनी अडवले. आरोपींनी समर्थला अडवून ‘तू जास्त नाटक करत होतास, तुझी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होतो, आज तुझा गेम वाजवून टाकणार’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

 

समर्थने संबंधितांना समजावून सांगत माफी मागितली आणि जुना विषय सोडून देण्याची विनंती केली. मात्र, आरोपींनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या पॅन्टमध्ये लपवून ठेवलेली लोखंडी धारदार हत्यारे बाहेर काढली आणि हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप समर्थने केला आहे. यावेळी ‘आम्ही इथले भाई आहोत, आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही,’ असे म्हणत सौरभ नेटके याने हातातील धारदार हत्यार समर्थवर उगारला. मात्र, समर्थने प्रसंगावधान राखत वेळीच खाली वाकल्याने हत्याराचा वार चुकला.

या प्रकारामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि नागरिकांची पळापळ सुरू झाली होती. या घटनेनंतर समर्थने घरी जाऊन आईला प्रकाराची माहिती दिली आणि त्यानंतर मांजरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पूर्वीच्या भांडणाच्या रागातून आरोपींनी संगनमत करून आपल्याला मारण्याच्या उद्देशाने अडवले, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि धारदार हत्यारे दाखवत परिसरात दहशत निर्माण केली, असा आरोप समर्थ क्षीरसागर याने केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

Wednesday, 30 September 2026, 23:23

लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील रेल्वे अंडरपासच्या कामाला अखेर सुरुवात; सनी काळभोरसह मान्यवरांचे ग्रामस्थांनी मानले आभार..

Wednesday, 30 September 2026, 23:11

महाराष्ट्राला बनवणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’! नवी मुंबईत ३०० एकरवर भव्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ उभारली जाणार

Wednesday, 30 September 2026, 22:58

Ind Vs WI 2nd ODI : गुवाहाटीत डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार! वन-डे सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय; एकाच सामन्यात मोडले तब्बल १० पेक्षा जास्त ऐतिहासिक विक्रम

Wednesday, 30 September 2026, 22:41

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05
Next Post

नेपाळमध्ये साताऱ्याच्या 10 महिला पर्यटक सुरक्षित; प्रशासनाच्या संपर्कात, पोखरातील हॉटेलमध्ये मुक्काम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp