Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi News : पीएमटी बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याच्या सोन्याच्या मिनी गंठणवर चोरट्याने मारला डल्ला..

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 23 May 2026, 18:24

Fursungi News  फुरसुंगी, ता. २३ : हडपसर ते फुरसुंगी दरम्यान पीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तब्बल ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २१ मे रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. गर्दीच्या बसमध्ये प्रवास करताना चोरट्यांनी हातचलाखी करत दागिना चोरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Fursungi News

याबाबत लतिका विकास केदारी (वय ४९, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारी या मागील ३० वर्षांपासून ससाणेनगर परिसरात वास्तव्यास असून, वर्धमान न्यू इंग्लिश स्कूल येथे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. केदारी या आपल्या मुलगा शिवम याच्या घरी जाण्यासाठी हडपसर गाडीतळ येथून फुरसुंगीच्या दिशेने जाणाऱ्या पीएमटी बसमध्ये बसल्या होत्या. Fursungi News

प्रवासादरम्यान बसमध्ये मोठी गर्दी होती. साधारण ७.४५ वाजता त्या फुरसुंगी बसस्टॉपवर उतरल्या. मात्र, उतरल्यावर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बसमध्ये तसेच परिसरात शोध घेतला, मात्र दागिना मिळून आला नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेल्याची खात्री झाली. चोरीस गेलेल्या दागिन्यामध्ये दोन वाट्या असलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण असून त्याची चालू बाजार भावाप्रमाणे १ लाख ५० हजार रुपये किंमत आहे. Fursungi News

दरम्यान, पीएमटी बसमध्ये वाढत्या गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने, मोबाईल आणि पाकिटे चोरणाऱ्या टोळ्यांचा पुन्हा सुळसुळाट झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत महिला प्रवाशांना लक्ष्य केले जात असल्याने प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, बसमधील सीसीटीव्ही आणि परिसरातील फुटेजच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत. Fursungi News

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp