Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : गर्भलिंग निदान प्रकरणी उरुळी कांचन येथील माहेर हॉस्पिटलच्या डॉ. मोटेला बेड्या ; तर सुंदरम कदमसह तीन डॉक्टर अद्याप फरार..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 12 June 2026, 10:23

Pune News : उरुळी कांचन, (पुणे) : केडगाव येथील बहुचर्चित असणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. या विशेष तपासणी मोहिमेत रुग्णालयांचे विविध कारनामे आणि गंभीर अनियमितता उघडकीस आल्या आहेत. Pune News

या कारवाईअंतर्गत उरुळी कांचन येथील नामांकित ‘माहेर हॉस्पिटल’चे डॉ. तुकाराम मोटे याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरीकडे, दौंडमधील ‘लवंगिरे हॉस्पिटल’ मध्ये वैद्यकीय गर्भपात (MTP) कायद्याचे उघड उघड उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने, तिथले सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे स्त्री भ्रूणहत्येला खतपाणी घालणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. Pune News

या प्रकरणात सहभाग निष्पन्न झालेले एकूण 3 डॉक्टर सध्या हुलकावणी देत फरार आहेत. यामध्ये उरुळी कांचन येथील डॉ. सुंदरम कदम (रा. उरुळी कांचन), डॉ. मंदार सुरेश माळी (रा. किकवी, ता. भोर), व डॉ. स्वाती लवंगिरे (रा. दौंड) हे तीन डॉक्टर सध्या फरार आहेत. या तिन्ही फरार डॉक्टरांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. तर अटक करण्यात आलेला उरुळी कांचनचा डॉ. तुकाराम मोटे याच्यावर कोर्टात न्यायालयीन प्रक्रिया आणि कायदेशीर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. Pune News

 

केडगाव येथील गर्भलिंग निदान रॅकेट उघड झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या 4 विशेष पथकांनी तालुक्यात धाडी टाकल्या. 25 सोनोग्राफी केंद्रे, 20 गर्भपात (MTP) केंद्रे, 19 नर्सिंग होमची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान अनेक बड्या हॉस्पिटल्समध्ये कागदपत्रांची अफरातफर आणि गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. Pune News

दरम्यान, आरोग्य पथकाने दौंड येथील लवंगिरे हॉस्पिटलवर छापा टाकला असता, तिथे वैद्यकीय गर्भपाताशी संबंधित आवश्यक नोंदी व कागदपत्रांमध्ये अत्यंत गंभीर गैरव्यवहार आढळला. पीसीपीएनडीटी (PCPNDT) आणि एमटीपी (MTP) कायद्याचा धज्जा उडवल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन तात्काळ जप्त करून सील ठोकण्यात आले आहे. या गुन्ह्याची मुख्य सुत्रधार असणारी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती लवंगिरे ही गुन्हा दाखल होताच पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाली आहे. Pune News

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

Loni Kalbhor News: अंगूर बारसमोरून 'युनिकॉर्न' मोटारसायकल लंपास; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.