Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : लाखो रुपयांचा पगार असतानाही 2 हजारांची लाच स्वीकारताना उरुळी कांचन येथील महावितरणचा कार्यकारी अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 4 March 2024, 18:51

उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत जमिनीतील लाईट पोल दुसरीकडे शिफ्टींग करण्यासाठी परवानगी देण्यासाठी सरकारी ठेकेदाराकडून 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 04) रंगेहात पकडले.

 

धम्मपाल हीसाजी पंडीत, (वय 50, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका सरकारी विद्युत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक सरकारी विद्युत ठेकेदार आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) येथील खाजगी जमीन मालक यांनी तक्रारदार यांना त्यांच्या जमिनीतील लाईट पोल दुसरीकडे शिफ्टींग करण्याचे काम दिले होते. सदर कामाची फाईल मंजुरीकरीता लोकसेवक धम्मपाल पंडीत यांचेकडे प्रलंबित होती. नमुद फाईल मंजुर करण्यासाठी लोकसेवक धम्मपाल पंडीत यांनी तक्रारदार यांच्याकडे २ हजार रुपयांची मागणी केली होती. लाच मागणी केल्याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना तक्रार दिली होती.

दरम्यान, या प्रकाराची खात्री करण्यासाठी सोमवारी (ता.4) धम्मपाल पंडीत यांनी तक्रारदार यांच्याकडून २ हजार रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानुसार, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव करत आहेत.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

यापूर्वीही लाचेची झाली होती मागणी

याच कार्यालयातील तत्कालीन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप वासुदेव सुरवसे यालाही खाजगी विद्युत ठेकेदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर धम्मपाल हिसाजी पंडित यालाही ताब्यात घेतल्याने उरुळी कांचन येथील महावितरणचे कार्यालय चांगलेच चर्चेत आले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Shocking incident in Pimpri! Man abuses minor girl twice; Called girl home, threatened her and....

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! नराधमाचा चिमुकलीवर दोनदा अत्याचार; मुलीला घरी बोलावलं, धमकी दिली अन्….

Saturday, 4 April 2026, 18:55

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44
Next Post

सरकारीसह खासगी विद्यापीठांनी वंचितांपर्यंत पोहोचायला हवे : राज्यपाल रमेश बैस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.