Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडलं ; एका कुत्र्याविरोधात पोलिसात तक्रार…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 April 2023, 13:47

(Crime) मुंबई : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी आरोपांची चिखलफेक तर कधी मनोमिलन हे सातत्याने घडत असते. परंतू आता एक वेगळीच घटना घडल्याचे समोर आल्याने हसावे की रडावे तेही समजत नाही. राजकीय पोस्टर फाडणे तसे काही नवीन नाही. यामुळे अनेकवेळा कार्य़कर्त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल होत असतात. मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडल्याने आता कार्यकर्त्याच्या नव्हे तर थेट एक कुत्र्याच्या विरोधात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.

एका भटक्या कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडल्याने त्या कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आहे. कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडल्याने काही महिलांनी थेट कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार केली. तसंच मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या या कुत्र्याविरोधात कारवाई करा अशीही मागणी केली.

येथे घडली ही घटना…

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडामध्ये ही घटना घडली असून. या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचे पोस्टर कुत्र्याने फाडलं आहे. एका भिंतीवर हे पोस्ट होतं जे कुत्र्याने फाडलं., असे दिसत आहे. त्यानंतर या कुत्र्याच्या विरोधात विजयवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

मीडिया रिपोर्ट्स नुसार स्वतःला विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणवणाऱ्या दसारी उदयश्री यांनी उपहासात्मक पद्धतीने ही तक्रार दाखल केली आहे. काही महिलांना घेऊन त्या पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यांनी पोलिसांना सांगितलं की व्हायरल व्हिडिओत कुत्रा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पोस्ट फाडतो आहे त्यामुळे त्या कुत्र्याच्या विरोधात कारवाई करा.

उदयश्री यांनी माध्यमांना हे सांगितलं की जगनमोहन रेड्डी यांच्या विषयी माझ्या मनात खूप आदर आहे. त्यांचा पक्ष १५१ जागा जिंकून सत्तेवर आला आहे. अशा मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडून कुत्र्याने त्यांचा अपमान केला आहे. राज्याच्या सहा कोटी लोकांचा या कुत्र्याने अपमान केला आहे. आम्ही पोलिसात या भटक्या कुत्र्याविरोधात तक्रार दिली आहे तसंच पोलिसांना हेदेखील सांगितलं आहे की लवकरात लवकर या कुत्र्याला जेरबंद करा कारण आमच्या राज्याच्या प्रिय मुख्यमंत्र्यांचा या कुत्र्याने अमपान केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Ambedkar Jayanti 2023 | आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात पाच हजार किलो मिसळ, एक लाख नागरिकांना ताक वाटप...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.