Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सरकारी धान्यावर डल्ला मारणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने यवत येथून ठोकल्या बेड्या ; तब्बल १३ लाखांचा मुद्देमाल जप्त..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 4 January 2023, 18:38

राहुलकुमार अवचट

यवत : पुणे – सोलापूर महामार्गावरील यवत ग्रामपंचायत हद्दीत रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन मालवाहतूक टेम्पो व धान्य असा १२ लाख ७३ हजार २५० रुपयांचा मुदेमाल जप्त केला आहे.

मुकेश नरसिंगराव माधव (वय – २१ रा. बिबेवाडी वोटा नं १०९, सुहाग मंगल कार्यालय ता. हवेली), भाऊसाहेब अर्जुन कुटे वय ३७, रा. नाईस प्लॉट, कॅनॉल जवळ चारभुजा सायकल मार्टचे पाठीमागे, गुलटेकडी ता. हवेली), सादिक इलाहीबक्ष अलबेलकर वय ५५, रा. काशीवाडी, भवानी पेठ ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर रेशन धान्याची अफरातफर करत चोरट्या पद्धतीने वाहतूक व विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन घाडगे यांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. मिळालेल्या माहिती वरिष्ठांना सांगितली. त्यानुसार वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार दौंडचे पुरवठा अधिकारी व यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना कळविण्यात आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कासुर्डी टोलनाका येथे सापळा रचण्यात आला.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने जाणारे तीन मालवाहतूक टेम्पो पकडण्यात आले. गाड्यांच्या चालकांना गाडीत असलेल्या मालासंबंधी विचारणा केली असता त्यांनी गाडीत गहू, तांदूळ, हरभरा असल्याचे सांगितले. यावेळी अधिक चौकशी केली असता चालकांकडे मालाशी संबंधित कोणतीच कागपत्रे नव्हती.

पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी जावेद लालू शेख, कासिम शेख व अमोल कंधारे, अब्बास अब्दुल सरकारवर (रा. तिघेही काशेवाडी, पुणे) यांचा माल असल्याची कबुली दिली. सदरचा माल वाहनचालक केडगाव येथील दुकानदार यांच्याकडे घेऊन जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले. धान्याची पडताळणी केली असता ते रेशनिंगचेच असल्याची खात्री करण्यात आली.

दरम्यान, पंचांना बोलावून पंचनामा करण्यात आला. या तीनही वाहनांत मिळून १० हजार ८०० किलो रेशनिंगचे तांदूळ, ३०० किलो गहू, २५ किलो हरबरा असे रेशनिंगचे धान्य मिळून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन मालवाहतूक टेम्पो व धान्य असा १२ लाख ७३ हजार २५० रुपयांचा मुदेमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलिस हवालदार सचिन घाडगे, असिफ शेख, अजित भुजबळ, विजय कांचन, अजय घुले, धिरज जाधव यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

सावित्रीबाईंच्या योगदानाची जाणीव आजच्या पिढीने ठेवायला हवी : सुहास गलांडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.