Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये भाडेकरूंची माहिती लपविणाऱ्या तीन घरमालकांवर गुन्हे दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 August 2026, 16:03

लोणी काळभोर : पुणे शहर पोलीस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 163(3) अंतर्गत जारी केलेल्या आदेशाची अवहेलना करत भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात नोंदवली नसल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील तीन घरमालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष शाखेच्या पथकाने केलेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली.

वागसिंग, रोहिणी संजय वाघुले व दत्तात्रय बाबुराव खुणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या घरमालकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात ४ जुलै ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी घरमालक, भाडेकरू आणि इस्टेट एजंट यांनी भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असल्याचे आदेश लागू आहेत. या आदेशाची व्यापक प्रसिद्धी करूनही काही घरमालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे तपासात समोर आले.

विशेष शाखेच्या पथकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणी केली असता, रोहिणी कॉम्प्लेक्स, लोणीगाव येथील घरमालक वागसिंग यांनी भाडेकरू सुरज अनुप गास्वामी यांची माहिती पोलीस ठाण्यात दिली नसल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे याच रोहिणी कॉम्प्लेक्समधील घरमालक रोहिणी संजय वाघुले यांनी भाडेकरू मिलिंद रावसाहेब शिंदे यांची माहितीही पोलिसांना दिली नव्हती.

याशिवाय, अष्टापुरमळा रोड, घोरपडेवस्ती येथील श्रीराम निवास बिल्डिंगचे घरमालक दत्तात्रय बाबुराव खुणे यांनी भाडेकरू कुणाल शामराव साळुंखे यांची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंदवली नसल्याचेही तपासात उघड झाले.

 

या तिन्ही प्रकरणांत घरमालकांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशाची जाणूनबुजून अवज्ञा केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 अन्वये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी सर्व घरमालकांना आवाहन केले आहे की, आपल्या घरात किंवा इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक भाडेकरूची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात वेळेत नोंदवावी. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हरकत प्रलंबित…तरीही ‘क’ प्रत तयार? शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; नियम धाब्यावर बसविल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Wednesday, 5 August 2026, 17:27

फुरसुंगीत गुन्हे शाखेने 1 किलो गांजासह पकडले दोन तस्कर; फुरसुंगी पोलीस मात्र ‘गांजा ओढणाऱ्यां’वर कारवाई करण्यात व्यस्त?

Wednesday, 5 August 2026, 16:59

मुख्यमंत्री फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! 2029 च्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना अल्टीमेटम, घेतला मोठा निर्णय?

Wednesday, 5 August 2026, 16:45

उरुळी कांचन-शिंदवणेतील शेती भांडारांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाची धाड; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Wednesday, 5 August 2026, 16:28

लोणी काळभोरमध्ये भाडेकरूंची माहिती लपविणाऱ्या तीन घरमालकांवर गुन्हे दाखल

Wednesday, 5 August 2026, 16:03

कवडीपाट टोलनाक्याजवळ पार्क केलेल्या कारला मद्यधुंद चालकाची धडक; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 5 August 2026, 15:51
Next Post

उरुळी कांचन-शिंदवणेतील शेती भांडारांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाची धाड; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.