Big Breaking लोणी काळभोर, ता. ५ : पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत घरात धारदार शस्त्र लपवून ठेवल्याच्या गंभीर प्रकरणात लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिसांनी सोमवारी (रा.4) मध्यरात्री धाडसी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. लोणी काळभोर पोलिसांच्या या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. Big Breaking

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारम प्राजक्ता मनीष पाबळ यांनी त्यांच्या पती मनीष बाबुराव पाबळे (वय ४१, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर) यांनी बंदुकीने ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली होती. यासंदर्भातील व्हॉईस रेकॉर्डिंगही पोलिसांकडे पाठवण्यात आले होते. Big Breaking
या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक दिगंबरसोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसमक्ष मंगळवारी (ता.५) पाहते पावणे दोन वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या घरावर छापा टाकला. सुरुवातीला आरोपीने झडतीस विरोध व टाळाटाळ केली; मात्र पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर घराची सखोल तपासणी करण्यात आली. Big Breaking
झडतीदरम्यान घरातील लोखंडी कपाटात लपवून ठेवलेली एक धारदार लोखंडी तलवार पोलिसांच्या हाती लागली. ही तलवार सुमारे ७१ सेंटीमीटर लांबीची असून तिच्या पात्याला धार असल्याचे आढळले. पोलिसांनी ती पंचांसमक्ष जप्त करून सील केली व पंचनामा केला.
या प्रकरणी पोलीस अंमलदार निखील श्रीरंग मेमाणे यांनी सरकारच्यावतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी मनीष बाबुराव पाबळे याच्या विरुद्ध आर्म अॅक्ट 4(25) तसेच महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम 37(1) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पुणे शहर पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.






