Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime : सांगवी येथील तरुणाच्या खुनाच्या निषेधार्थ गावकरी एकवटले ; गुन्हेगारांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न, ग्रामस्थांचा आरोप..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 15 April 2023, 14:42

Baramati Crime बारामती, (पुणे) : जमिनीच्या वादातून सांगवी (ता. बारामती) येथे तीन दिवसांपूर्वी विनोद हिराचंद फडतरे (वय ३०) या तरुणाचा चुलत भाऊ विशाल गणपत फडतरे याने दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आरोपीचे संपूर्ण कुटुंबच या कटात सामील आहे, यामुळे यातील मुख्य आरोपी इतर आरोपींना पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी, अशी मागणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक चंद्रराव तावरे यांनी केली.

बुधवारी (ता. १२) सकळी हि घटना घडली होती. या झालेल्या घटनेमुळे घाबरलेल्या मयत विनोद फडतरेच्या कुटुंबीयाला पाठबळ देण्यासाठी व झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी (ता. १५) सकाळी गावात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी तावरे बोलत होते.

संपूर्ण गाव एकवटले…!

यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. तर खून करणाऱ्या विशाल फडतरे या आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी यात सहभाग घेऊन गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा मिळून सह आरोपींना कठोर शासन होण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सर्व पक्षातील पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विनोद फडतरे यांच्या हत्येनंतर कुटुंबाला दिलासा देण्यासाठी गुरुवारी (दि. १३) ग्रामस्थांकडून तातडीची बैठक घेण्यात आली होती. गावच्या इतिहासातील ही पहिलीच दुर्दैवी घटना असल्याने विशाल फडतरे सारख्या मनोवृत्तीच्या नराधमाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गावात कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करून मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुनाच्या काही तासानंतर प्रत्यक्षदर्शी खून करताना पहिलेल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती. जमिनीच्या वादातून वारंवार चुलत भावांमध्ये वितुष्ट येत होते.

दरम्यान, खून करणाऱ्या आरोपीला साक्षीदारांनी दिलेल्या माहितीमुळे पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र, सह आरोपी असणारे गणपत फडतरे व विक्रम फडतरे यांना फरार होण्यास पोलिसांनी मदत केली. उच्च पदस्थ लोकांच्या सांगण्यावरून व विक्रम फडतरे हा पोलीस दलात असल्याने व त्यांचे लागेबांधे असल्याने माळेगाव पोलीस इतर दोन आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.

आरोपींच्या अटकेबाबत पोलिसांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तिघे आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे गावकऱ्यांचा पोलिस व आरोपींवरील संताप यामुळे व्यक्त होताना दिसून आला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

Vijay Vadettiwar | सावरकर म्हणायचे बलात्कार हे राजकीय हत्यार, मुलीच्या 'या' विधानावर विजय वडेट्टीवारांनी दिले स्पष्टीकरण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.