Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur Crime : हुंड्यावरुन वाद! तरुणाला मानवी विष्ठा, लघवी पिण्यास पाडलं भाग; इंदापूरातून किळसवाणा प्रकार समोर

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 28 April 2023, 14:18

दीपक खिलारे

इंदापूर  Indapur Crime :  लग्न आणि हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने एका २१ वर्षीय युवकाला मारहाण करण्यासह लिंबू हळद लावून शिव्या शाप देत त्याला आरोपी लज्जास्पद कृत्य करण्यास तसेच मानवी विष्ठा खाण्यास आणि लघवी पिण्यास तसेच गुद्दवार चाटण्यास भाग पाडल्याचा अघोरी प्रकार इंदापूर (Indapur Crime)  तालुक्यातील काटी येथे घडला. (Indapur Crime)

११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल 

याप्रकरणी ११ जणांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ४ महिलांचाही समावेश आहे.

 

याबाबत अनिकेत विजय भोसले (रा. साठेफाटा, फलटण ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. बेंबळे ता. माढा जि. सोलापूर) या युवकाने इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादनुसार फिर्यादीचे ३ वर्षांपूर्वी आरोपीच्या मुलीशी जमलेले लग्न हुंड्यामुळे फिस्कटले होते.

दरम्यान, या प्रकरणात वाद विकोपाला गेल्यानंतर ५ लाख हुंड्याची मागणी करत आरोपींनी फिर्यादी युवकाला मारहाण केली. देवाच्या नावाने आरडाओरडा करत फिर्यादीला लिंबू, हळद लावून शिव्या शापही दिला. हद्द म्हणजे जबरदस्तीने नवरी मुलीसह आरोपी महीलेशी लज्जास्पद कृत्य करायला लावले.

आणि मानवी विष्ठा, लघवी पिण्यासारखे तसेच गुद्द्वार चाटण्यासारखे घाणेरडे कृत्य करण्यास फिर्यादीला भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पैकी एका आरोपी महिलेने या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून तो आपल्या फेसबुकवर शेअर केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. त्यामुळे आरोपींवर आयटी ॲक्टचे ६७ अ कलम देखील लावण्यात आले आहे.

आरोपींनी फिर्यादीच्या आईसमोर लाज लज्जेची सीमा ओलांडली

फिर्यादी ऊसतोड मजूर असून, लाखोंच्या हुंड्यामुळे हे लग्न मोडले होते. परिणामी मुलीचे कुटुंबीय इतर ठिकाणी तीचे लग्न करणार असल्याने फिर्यादी युवक आणि संबंधित मुलगी लग्नाच्या ऐन एक दिवस आधी (१० एप्रिल) घरातून पळून गेले होते. मात्र आरोपींनी दोघांनाही पकडून जबरदस्तीने काटी या ठिकाणी आणले. आरोपींनी लाज लज्जेची सीमा ओलांडून फिर्यादीच्या आईसमोरच वरील सर्व घाणेरडे कृत्य घडवून आणले आणि त्याचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर शेअर केले.

आरोपींमध्ये स्वप्नाली कासलिंग शिंदे, दीदी अजय पवार, वंदना बापूराव शिंदे आणि मंदा काळे या ४ महिलांसह दिनेश शिंदे, बापूराव शिंदे, कासलिंग बापूराव शिंदे, अजय पवार, लखन काळे, दिनेश शिंदे यांचा मुलगा (सर्व रा. काटी, ता. इंदापूर) आणि अतुल काळे (रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशा ७ पुरुषांचा समावेश आहे. पैकी तिघा जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तिघांचीही रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Indapur News : हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सहकार महर्षी कारखान्याच्या बिनविरोध संचालकांचा सत्कार…!

Indapur News : इंदापूर बसस्थानकात प्रवाशांची सुरक्षितता ‘राम भरोसे’ ; बसस्थानकातील स्लॅब कोसळला, प्रवाश्यांमध्ये गोंधळ..

Pune : प्रेमाचा विरोध जिव्हारी लागलाच महिलेची हत्या; कर्नाटकातून आरोपीला ठोकल्या बेड्या

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post

Daund Accidenat News : पाटस-दौंड रस्त्यावर मालवाहू ट्रक व चारचाकी गाडीचा भीषण अपघात ; अपघातात ८ जण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.