Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सातव’ आडनावाचा फायदा घेत वाघोलीतील 81 वर्षीय वृद्धेची बनावट सह्यांद्वारे 42 लाखांची फसवणूक, ‘भारती एअरटेल’सह 6 जणांवर वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 6 September 2026, 11:04

वाघोली : वाघोली येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीच्या मालकिणीची बनावट सही, खोटे ना-हरकत प्रमाणपत्र व बोगस प्रतिज्ञापत्र तयार करून, खाजगी कंपनीला केबल टाकण्याची परवानगी देत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर वाघोली पोलिसांनी भारती एअरटेल लिमिटेड कंपनीसह 6 जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

अजित सुरेश सातव (वय 33, रा. वाघोली), सातव लँडमार्कस (प्रो. प्रा. अजित सुरेश सातव), संतोष निवृत्ती तांबे (वय 35, रा. बायफ रोड, वाघोली), सागर जाधव (वय -36, रा. संत तुकाराम नगर, वाघोली) विकास पोखरणा (वय-38, एअरटेल कर्मचारी, रा. खराडी, पुणे) व भारती एअरटेल लिमिटेड (खराडी, पुणे व गुडगाव, हरियाणा शाखा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत निर्मलादेवी प्रतापराव सातव (वय -81, रा. गणेशखिंड रोड, शिवाजीनगर) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वरील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मलादेवी सातव यांची वाघोली (ता. हवेली) येथील गट क्र. 569 आणि 570 मध्ये मालकी हक्काची जमीन असून, त्यांनी भावडी रोड ते अहिल्यानगर हायवेपर्यंत स्वखर्चाने सिमेंट रस्ता बनवला आहे. 2018 मध्ये या जागेवर बांधकाम सुरू असताना, आरोपी अजित सुरेश सातव याने फिर्यादींच्या ‘सातव’ या आडनावाशी साधर्म्य असल्याचा गैरफायदा घेतला. स्वतःला निर्मलादेवी यांचा पुतण्या भासवून, त्याने 1नोव्हेंबर 2018 रोजी निर्मलादेवी यांची बनावट सही असलेले खोटे सहमती पत्र आणि 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले.

या बनावट कागदपत्रांच्या आधारे, निर्मलादेवी यांच्या मालकीच्या जमिनीतून तब्बल 2हजार 275 मीटर ऑप्टिक फायबर केबल टाकण्यासाठी भारती एअरटेल कंपनीला बेकायदेशीर परवानगी दिली. आरोपी अजित सातव याने फिर्यादींच्या मूळ फर्मसारखे नाव वापरून ‘सातव लँडमार्कस’ नावाने आय.डी.बी.आय. बँक, वाघोली शाखेत बोगस खाते उघडले. भारती एअरटेल कंपनीने जमिनीच्या मूळ मालकी हक्काची कोणतीही खातरजमा न करता, आरोपींच्या संगनमताने 19 नोव्हेंबर 2018 रोजी या खात्यात 17 लाख 06 हजार 250 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरला व 1 लाख 89 हजार 583 रुपयांच्या TDS चा अपहार केला.

 

फिर्यादी निर्मलादेवी सातव यांना या बेकायदेशीर कृत्याची माहिती जुलै 2023 मध्ये मिळाल्यानंतर, त्यांनी वकिलांमार्फत एअरटेल कंपनीला नोटिसा पाठवल्या. कंपनीने जानेवारी 2024 मध्ये पाठवलेल्या उत्तरावरून आरोपींनी केलेल्या महाघोटाळ्याची पोलखोल झाली. या संपूर्ण प्रकारातून आपली तब्बल 42 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी (न्यायालय क्र. 06, पुणे) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 175 (3) अन्वये वाघोली पोलिसांना तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून वाघोली पोलिसांनी वरील आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे. पुढील सखोल तपास वाघोली पोलीस करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मांजरी खुर्दमध्ये इलेक्ट्रिक साहित्याच्या गोदामावर चोरट्यांचा डल्ला ; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून मुद्देमाल लंपास

Sunday, 6 September 2026, 11:26

‘सातव’ आडनावाचा फायदा घेत वाघोलीतील 81 वर्षीय वृद्धेची बनावट सह्यांद्वारे 42 लाखांची फसवणूक, ‘भारती एअरटेल’सह 6 जणांवर वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल..

Sunday, 6 September 2026, 11:04

गणेशोत्सवाआधी मोठी बातमी! कोकण प्रवासासाठी 6 स्पेशल ट्रेन; पुणे-रत्नागिरी रेल्वेचे वेळापत्रक समोर

Sunday, 6 September 2026, 10:48

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट! थर रचताना काळाचा घाला; 2 गोविंदांचा दुर्दैवी अंत, 300 हून अधिक जखमी

Sunday, 6 September 2026, 9:06

मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळला अन् उचललं टोकाचं पाऊल; पुण्यात 26 वर्षीय तरुणाची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, चिठ्ठीत धक्कादायक खुलासा!

Sunday, 6 September 2026, 8:43

मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव! मोबाईल-प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग; धुराचे लोट अन् नागरिकांची धावपळ

Sunday, 6 September 2026, 8:27
Next Post

मांजरी खुर्दमध्ये इलेक्ट्रिक साहित्याच्या गोदामावर चोरट्यांचा डल्ला ; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून मुद्देमाल लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp