Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ignorance : १२ वर्षीय बहिणीची पहिली मासिक पाळी बेतली जीवावर, चारित्र्याच्या संशयावरून भावाने कायमचाच काढला काटा…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 May 2023, 11:13

उल्हासनगर Ignorance : उल्हासनगरमध्ये भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. (Ignorance)  पहिल्यांदाच मासिक पाळी आलेल्या १२ वर्षीय बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावाने केलेल्या बेदम मारहाणीत बहिणीचा मृत्यू झाल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली. (Ignorance)

लहान असलेल्या  मुलीला आपल्या भावाला नेमकं उत्तर देता आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय मृत मुलगी ही आपला मोठा भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. तर तिचे आई-वडील हे गावी राहतात. मुलीची हत्या करणारा तिचा भाऊ हा सुरक्षा रक्षकाचे काम करतो. मुलीला काही दिवसांपूर्वीच मासिक पाळी आली होती. ज्यामुळे तिचे कपडे हे रक्ताने माखले होते. कपड्यांवर रक्ताचे डाग पाहून भावाने आपल्या लहान बहिणीला याबाबत विचारणा केली. पण वयाने अगदीच लहान असलेल्या या मुलीला आपल्या भावाला नेमकं उत्तर देता आले नाही.

दरम्यान, मुलीच्या वहिनीने तिच्या पतीच्या मनात बहिणीबाबत संशयाच्या किडा सोडला. यावेळी तिने आपल्या पतीला काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या. मुलीच्या वहिनीने तिच्या पतीला असंही सांगितलं की, तुमच्या बहिणीचे काहीतरी प्रेम वैगरे सुरू आहे. आणि जो काही रक्तस्त्राव होतोय तो केवळ संभोगामुळेच झाला आहे.

 

बायकोने ही गोष्ट सांगताचा मुलीचा भाऊ प्रचंड संतापला आणि त्याने आपल्या बहिणीला मारहाण सुरू केली. सलग तीन दिवस तो तिला मारहाण करत होता. तीन दिवस तो तिला लाथा-बुक्क्यांनी मारत होता. ‘तुझे शारीरिक संबंध झाले आहेत का? अशी सतत विचारणा तो तिला करत होता. मात्र, याबाबत बहिणीला फार काही उत्तरे देता येत नव्हती.

सुरुवातीला दोन दिवस लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या भावाने तिसऱ्या दिवशी थेट स्टीलच्या पक्कडनेच बहिणीला मारहाण केली. ही मारहाण एवढी भीषण होती की, मुलगी थेट जमिनीवर कोसळली. त्यानंतर ती उठलीच नाही.

घाबरलेल्या भावाने बहिणीला उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी मंगळवारी (ता.९) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दाखल केले. त्यावेळी कर्तव्यावर असलेले वैदयकिय अधिकारी डॉ. प्रतिक यांनी तिला तपासल्यानंतर मयत घोषित केलं. तसेच तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याने तात्काळ ह्या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिसांना देखील कळवली.

डॉक्टरांनी मृत मुलीचे शवविच्छेदन केल्यानंतर मुलीच्या चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवर मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले. ज्याबाबतची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला मुलीच्या भावाकडे विचारणा केली. पण त्याने फारशी समाधानकारक उत्तरं दिली नाही.

दरम्यान, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड याच्या आदेशाने पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात यांच्या पथकाने मुलीच्या भावाला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा त्याने घडल्या प्रकाराची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Manchar News | धक्कादायक ! वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने लुटून तिचे तोंड मातीत दाबून खून ; मंचर परिसरातील घटना…

Breaking News : अवघ्या दीड हजारासाठी एकावर ब्लेडने सपासप वार करून खून, वारज्यातील धक्कादायक घटना…!

Pune Crime | दारुड्या वडिलांचा मुलाकडून डोक्यात दगड घालून खून ; मुळशीतील घटना, आरोपी अटकेत…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

क्रिकेट स्पर्धेतील गोळीबार प्रकरणात योगेश मचालेसह टोळीवर मोक्का; शिरूर पोलिसांची कारवाई

Monday, 27 July 2026, 12:38

श्री वेंकटेश मंदिर विकासकामांना सुरुवात; आणखी 2 कोटींचा निधी मंजूर

Monday, 27 July 2026, 12:12

राजगडमध्ये दहशत माजवणाऱ्या अक्षय इंगुळकरसह टोळीला दणका; पोलिसांकडून मोक्काची कारवाई

Monday, 27 July 2026, 12:07

NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटी! 100 पैकी 90 प्रश्न आधीच व्हायरल; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Monday, 27 July 2026, 10:37

महावितरणच्या वीजेच्या बॉक्सचा करंट लागून 63 वर्षीय महिलेचा मृत्यू; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 10:11

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01
Next Post

Eknath Shinde : ‘ड्रग्ज्स फ्री मुंबई’साठी धडक मोहिम; अंमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहिम राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.