लहू चव्हाण

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्याच्या पांगरी येथील नंदनवन कॉलनीमध्ये राहणाऱ्या ३७ वर्षीय चंद्रकांत किसन निकम याने सृष्टी बंगला येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदकांत किसन निकम, (मूळ गाव करंदी, ता. जावळी) हा सृष्टी बंगल्यामध्ये कामास होता. मंगळवारी त्याने स्वतःला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या बाबतची फिर्याद सूनील सहदेव धोंडे ( कुसुमकुंज कॉलनी , पांगारी, ता. महाबळेश्वर) यांनी पोलिस स्टेशनला दिली आहे. सदरच्या घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी भेट देऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, यशवंत महामूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज जायगुडे अधिक तपास करत आहेत.







