Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धायरीतील भयानक प्रकार ; मृतांच्या हाडांची पावडर विवाहितेला दिली खायला ; दर आमावस्येला अघोरी कृत्य ; सासरच्या लोकांवर सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 January 2023, 14:34

पुणे : व्यावसायिक प्रगती होत नसल्याने व मूळ बाळ होत नसल्याने अघोरी पूजा करून मृत माणसांची हाडे, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके यांच्या हाडांची पावडर तसेच स्मशानभूमीतील राख आणून त्याची पूजा केल्यानंतर तीच राख पाण्यात मिसळून विवाहितेला पिण्यासाठी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धायरी येथून समोर आला आहे.

विवाहितेच्या सासरी धायरी येथे व निगडी या दोन ठिकाणी हा प्रकार २७ एप्रिल २०१९ पासून सुरु होता. फिर्यादीच्या तक्ररीनंतर सिंहगड रोड पोलिसांनी विवाहितेच्या ससारच्या लोकांवर विवाहितेचा छळ, नरबळी, अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा नियमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २८ विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीई कम्प्युटर शिक्षण झालेल्या फिर्यादीचा २७ एप्रिल २०१९ रोजी विवाह झाला होता. यावेळी ससारच्या लोकांच्या हट्टाने सासरच्या ४५ महिलांना चांदीची जोडावी देण्यास भाग पाडले. तसेच लग्नात ८० तोळे सोने, सेलेरिओ कार देण्याची मागणी केली. ती देखील पूर्ण करताना लग्न करून देण्यात आले. प्रत्येक सणाला विविध गोष्टींची मागणी सासरच्या लोकांकडून करण्यात येत होती. जावयाला सुमारे २५-३० तोळे तर फिर्यादीला ५०-५५ तोळे सोने देण्यात आले होते. तसेच जून २०२० मध्ये गाडी घेण्यासाठी १० लाख रुपये देखील देण्यात आले होते.

 

विवाहितेच्या सासरचे लोक प्रत्येक आमावस्येला एकत्र जमून काळे कपडे घालून तळघरातील खोलीत काही तरी करत असत. कोरोनामुळे फिर्यादीच्या सासरची परिस्थती ढासळत चालली होती. त्यामुळे २२ मे रोजी त्यांनी अघोरी पूजा मांडली. टाचण्या टोचलेले लिंबू, बाहुल्या, मिरची, हळदी कुंकू असे साहित्य आणण्यात आले. फिर्यादीच्या जावेने एका महिलेला व्हॉटसअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल लावून पूजा पूर्ण केली. यानंतर प्रत्येक अमावास्येला असे कृत्य केले जात होते.

मुलबाळ होत नाही म्हणून एका अमावस्येच्या दिवशी रात्री तिचे दीर, जाऊ, पतीसह सर्व जवळच्या स्मशानभूमीमध्ये गेले आणि तेथे जळालेल्या मृतदेहाची काही हाडे गोळा केली. तसेच राख मडक्यात घेतली. ते सर्व घरी आणून त्याची पूजा केली. त्यानंतर मडक्यातील राख पाण्यामध्ये मिक्स करुन ते पाणी फिर्यादीला पिण्यासाठी दिले.

या प्रकारानंतर ११ फेबुवारी २०२१ रोजी जावेच्या निगडी येथील घरी पूजा करण्यात आली. त्यासाठी मृत माणसाचे केस, हाडे, घुबडाचे पाय व कोंबड्याचे मुंडके हे सर्व जावेच्या आईवडिलांनी अगोदर आणले. होते. मांत्रिक महिलेने अघोरी पूजा केली. त्यानंतर हाडाची पावडर करुन ती फिर्यादींना खायला सांगितली.

त्याला फिर्यादीने नकार दिल्यावर जावेच्या वडिलांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वर काढून ते तिच्या डोक्याला लावून जबरदस्तीने पावडर खाण्यास भाग पाडले. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार आणखी तीन चार वेळा झाला. त्यामुळे तिला मळमळ व उलट्या होऊ लागल्या. अंगावर रिअ‍ॅक्शन आली. तरीही तिच्या सासरकडील तिला दर अमावस्येला पूजा करायला लावत. ‘तु वांझोटी आहे, तुझ्यामुळे आमची आर्थिक प्रगती कमी झाली. तू पांढर्‍या पायाची आहे’, असे बोलून छळ करीत आहेत.

नंतर फेबु्वारी २०२१ मध्ये तिला सासरकडील लोकांनी जावेबरोबर तिच्या आईवडिलांच्या कोकणातील एका पुजेसाठी पाठविले होते. तेथे मध्यरात्री एका धबधब्याखाली आंघोळ करायला लावली. त्यावेळी तिच्या जावेने मांत्रिक महिलेशी व्हॉटसअ‍ॅप कॉलवर मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे जावेच्या आईवडिलांनी तिला अघोरी कृत्य करायला लावले.

हा प्रकार तिने पतीला सांगितला. तेव्हा त्याने आम्ही गुंड लोक आहोत, हे कोणाला सांगितले तर तुझ्या कुटुंबाचा मुडदा पाडू अशी धमकी दिली. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये फिर्यादीच्या पतीला क्रेटा गाडी घेण्यासाठी तिच्या वडिलांनी ८ लाख रुपये दिले. तरीही ते अर्धा हिस्सा देण्याची मागणी करीत होते. हा अघोरी प्रकार सुरु होता.

मुलबाळ होत नाही व आई वडिलांनी पैसे देणे बंद केल्यामुळे फिर्यादी यांना २६ मे २०२२ रोजी घरातून हाकलून दिले. त्यानंतर माहेरी आल्यावर त्यांनी नांदण्यास जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला. पंरतु त्यांनी दाद न दिल्याने शेवटी त्यांनी पोलिसांशी संपर्क करुन फिर्याद दिली असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post

दोन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार : अमित सोनवणे व गणेश भोसले यांना जिल्हाबंदी ; लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.