लोणी काळभोर: पुणे जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांपासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रविण मडीखांबेसह त्याच्या’ ७ साथीदारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे.
इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रविण सिद्राम मडीखांबे (वय ५१ रा. फ्लॅट नं. ९, श्री. संतोषी बिल्डींग, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे), टोळी सदस्य विशाल धानाजी धायगुडे (वय ३१, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर), बाळु अरुण चौरे (वय ३० रा. सिद्राममळा, लोणीकाळभोर पुणे), इसाक इस्माइल मचकुरी (वय ४२, रा.संभाजीनगर तारा हाइट्स, बी/४०४, लोणी काळभोर, ता. हवेली), संकेत अनिल शेंडगे (वय २९, गुजरवस्ती, कवडीपाट टोलनाका, कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर, पुणे), राजु तानाजी फावडे (वय ३२, रा. तुळजाभवानी मंदीराशेजारी, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर ता. हवेली, जि. पुणे.), नवनाथ बबन फुले (वय ४१ रा. सिद्राममळा, रामदरा रोड लोणीकाळभोर, ता. हवेली जि. पुणे) आणि आतीश शशिकांत काकडे वय ३१ वर्षे, रा. कोळपे वस्ती, लोणकाळभोर, ता. हवेली जि. पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) हद्दीतील डोंगरात २५ जुलैला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची (एचपी) जमिनीखालील पाईपलाईन फोडून इंधनचोरी झाल्याचे उघड झाले होते. या इंधन चोरी प्रकरणात लोणी काळभोर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. आरोपींनीही याबाबतची पोलिसांना कबुली दिली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी चोरीच्या पेट्रोलची विक्री करुन आलेले रोख १० लाख रुपये व चोरीतील २४ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला होता. प्रविण मडीखांबे व त्याच्या साथीदारांवर अशा प्रकारचे 10 पेक्षा अधिक गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
दरम्यान, प्रविण मडीखांबेसह त्याच्या ७ साथीदारांवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून हडपसर परिमंडळ पाचच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या माध्यमातून पोलीस उपायुक्त आर राजा यांच्याकडे पाठविला होता. पोलीस उपायुक्त आर राजा यांनी आरोपींच्या तडीपारीच्या प्रस्तावाला मान्यता देऊन आरोपींना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्यपार) क्र. ५५ प्रमाणे हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार तेज भोसले, पोलीस हवालदार संदीप धनवटे, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे यांनी केली आहे.
आरोपीचे नाव (कंसात तडीपारीचा कालावधी)
प्रविण मडीखांबे (२ वर्ष), विशाल धायगुडे (१ वर्ष),बाळु चौरे (१ वर्ष), इसाक मचकुरी (२ वर्ष), संकेत शेंडगे (१ वर्ष), राजु फावडे (१ वर्ष), नवनाथ फुले (१८ महिने), आतीश काकडे (१ वर्ष).