यवत : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यवत येथे मुख्य चौकात मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दोघांनी चोरी केली असल्याचे घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या यवत गावात जाणाऱ्या रस्ता व श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात असलेल्या मुख्य चौकात राणी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. त्यावेळी गल्ल्यातील एक लाख रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल चोरून नेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान चोरी करणारे दोघेही सडपातळ असून दोघांपैकी एक दुकानाच्या बाहेर उभा राहिला तर दुसरी व्यक्ती आत मध्ये जाऊन चोरी केली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे व पोलीस कर्मचारी शैलेश लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यवत पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दुकानामध्ये चोरी होत असेल तर वाड्या वस्त्यांमध्ये परिस्थिती गांभीर्य पूर्वक असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी यावेळी सांगितले. सर्व व्यावसायिकांनी व दुकानदारांनी आपल्या दुकानाचे शटर जाड अँगलचे बसवणे तसेच सेंटर लॉक बसवणे आवश्यक आहे जेणेकरून शटर सहजतेने उचकटणार नाही. तसेच दुकानांमध्ये रोख रक्कम ठेवणे टाळावे. सुरक्षितेच्या दृष्टीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे