पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘रेल विकास निगम लिमिटेड’, पुणे येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
‘रेल विकास निगम लिमिटेड’, पुणे येथे उप प्रकल्प व्यवस्थापक (लाँचिंग), नियोजन अभियंता आणि संपर्क अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पदासाठी 17 मे ही मुलाखतीची तारीख असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : उप प्रकल्प व्यवस्थापक (लाँचिंग), नियोजन अभियंता आणि संपर्क अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : RVNL चा पुणे मेट्रो प्रकल्प.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
– वयोमर्यादा : 45 वर्षे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 17 मे 2024.
– मुलाखतीचा पत्ता : रेल विकास निगम लि., ऑफिस नं. 202/A, दुसरा मजला, द ओरियन कॉन्डोमिनियम, अतुर पार्क जवळ, कोरेगाव पार्क, पुणे – 411001.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://rvnl.org/ वरून माहिती घेता येणार आहे.