नवी दिल्ली : प्रसिद्ध टेक्नॉलॉजी कंपनी Sony आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन गॅजेट्स लाँच करत आहे. सध्या कंपनीने कॅमेरा उत्पादनावर फोकस केला आहे. त्यात आता सोनीचा नवीन Sony ZV-II कॅमेरा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ZV सीरीजचा हा कॅमेरा असणार आहे. हा कॅमेरा 79,999 रुपयांमध्ये मिळू शकतो.
सोनीच्या या नवीन कॅमेराला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. ZV सीरीजच्या या कॅमेरांना मोठी मागणीही वाढताना दिसत आहे. ZV पेक्षा चांगल्या वाईड अँगलसह, ZV-II ब्लॉगरला आकर्षक व सुंदर फोटो हे याचे वैशिष्ट्ये आहे. ZV सीरीजमधील कॉम्पॅक्ट लेन्स आणि कॉम्पॅक्ट कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. विशेषत: सेल्फी काढताना त्याच्या 18 मिमी वाईड अँगल व्ह्यूसह आकर्षक फोटो घेणे सोपे होऊ शकते. 18-50 मिमी ऑप्टिकल झूम आणि क्लिअर इमेज झूम जो फोटोची गुणवत्ता सुधारतो.
यामध्ये 10 प्रकारचे Exmor RS इमेज सेन्सर (अंदाजे 20.5 प्रभावी मेगापिक्सेल) 18-50 मिमी वाईड अँगल लेन्स जे ग्रुप सेल्फीपासून ते अरुंद इंटीरियर आणि पिक्चरच्या डायनॅमिक रेकॉर्डिंगपर्यंत सर्व काही फ्रेम करू शकते. अनेक चेहरे ओळखणे आणि शॉट घेताना दोन किंवा तीन लोकांसाठी सर्व चेहऱ्यांचे सेल्फी कॅप्चर करणे असे अनेक फिचर या सोनीच्या नवीन कॅमेऱ्यात देण्यात आले आहेत.