आळंदी (पुणे): आळंदीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी पाचच्या सुमारास आळंदी जवळ असलेल्या सोळू गावातील लक्ष्मी मेटल कंपनीत घडली. या कंपनीत स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत. पन्नास मीटर अंतरातील परिसर या स्फोटाने हादरला. यामध्ये मोठी हानी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी जवळील साळू गावात भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये रस्त्यावर उभा असलेल्या एका व्यक्तीचा घटनेत मृत्यू झाला आहे. तर इतर सात जण जखमी झाले आहेत. ज्या हा ठिकाणी स्फोट झाला आहे, तिथे अल्युमिनियम प्लेट तयार करणारी लक्ष्मी मेटल कंपनी आहे. सदर कंपनी गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. कंपनीमध्ये स्फोट होऊन डीपीला आग लागली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.