Job Alert: पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांचा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, सातारा येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या पदासाठी भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सातारा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यात प्राध्यापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दोन लाखांपर्यंत पगार मिळू शकतो तर सहयोगी प्राध्यापक म्हणून निवड झालेल्या उमेदवाराला एक लाख 85 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
अशी असेल भरती प्रक्रिया…
पदाचे नाव : प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक.
रिक्त पदे : 25 पदे.
वयोमर्यादा : नियुक्तीच्या वेळी उमेदवाराचे कमाल 69 वय वर्षांपेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण : सातारा.
दरमहा वेतन / मानधन : प्राध्यापक : 2,00,000 तर सहयोगी प्राध्यापक 1,85,000 रुपये.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2023.
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.gmcsatara.org/ वरून माहिती घेता येणार आहे.