जीवन सोनवणे
खंडाळा, (सातारा) : घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा तब्बल ४ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिरवळ (ता. खंडाळा) ग्रामपंचायत हद्दीत हि घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी डॉ. अभिनव गायकवाड-पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अभिनव गायकवाड-पाटील यांचे संबंधित सोसायटीच्या खालील बाजूस स्वताःचे रुग्णालय आहे. तर पत्नी ही भोर, जि. पुणे याठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात नोकरीसाठी आहे.
लोहोम, (ता. खंडाळा) येथील डॉ. अभिनव दिलीप गायकवाड – पाटील हे आपल्या डॉक्टर पत्नीसमवेत शिरवळ येथील पळशी रोडवरील एका सोसायटीमध्ये राहण्यासाठी आले होते. यावेळी डॉ. अभिनव गायकवाड-पाटील हे रुग्णालयातून दुपारी घरी गेले असता त्यांना घराचे दरवाजाचे कुलूप दिसले नाही.
यावेळी पाहणी केली असता दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी लॉकर, कपाटामधील सोन्याच्या दागिन्या सह १७ हजार ८०० रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दरम्यान, संबंधित चोरटा हा सोसायटीमधील सीसिटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेची शिरवळ पोलीस स्टेशनला डॉ. अभिनव गायकवाड-पाटील यांनी फिर्याद दिली असून घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे करीत आहे.