Bhor News : भोर, (पुणे) : भोर तालुक्यातील ग्रामीण भागात अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तरुणांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुन्हा दाखल
विठ्ठल सोमनाथ यादव, अश्रफ अली शेर अली सय्यद, मयूर अशोक गोपी रेड्डी, अमित अरुण डाळिंबे, रेहान अली अरिफ सय्यद असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडशिवापूर हद्दीमध्ये सासवड रोड जवळ पुण्यातील तरुण गांजा या अमली पदार्थाचे सेवन करत असतानाच आढळून आले.
राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या आमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जात आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ मुकुल गायकवाड, पप्पू शिंदे, प्रशांत राऊत यांनी केली. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.