Pune News पुणे : लोहगाव-वाघोली रस्त्यावरील पेट्रोलपंप लुटण्याचा तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांचा डाव पोलिसांनी उधळला आहे. या कारवाईत विमानतळ पोलिसांनी लोहगाव (पुणे) येथून ५ दरोडेखोरांना गुरुवारी (ता.६) अटक केली आहे. (Pune News)
आरोपींनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा कट रचल्याची दिली कबुली.
उमेश राम गायकवाड (वय-३०), सूर्यकांत धोंडिबा रासगे (वय-४२), संतोष हरिदास गायकवाड (वय-३७), नितीन शंकर जाधव (वय-२९) आणि शेखर सीताराम गायकवाड (वय-५८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव-वाघोली रस्त्यावरील पेट्रोलपंप लुटण्याचा तयारीत काही दरोडेखोर आहेत. आणि ते फॉरेस्ट पार्क-लोहगाव रस्त्यावर लपून बसले असू त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून ५ जणांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.(Pune News)
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, आरोपींनी लोहगाव-वाघोली रोडवर असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी चार मुंढवा येथील व एक हडपसर येथील रहिवासी आहे.(Pune News)