Mumbai News : मुंबई : राज्यातील काही प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये शिवसेनेची एक जाहिरात आज प्रसिद्ध झाली. या जाहिरातीत राज्याचे उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचीच छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे असा उल्लेख देखील जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. भाजप नेत्यांनी या जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली. भाजपची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर शिवसेनेचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. युतीमध्ये सुरू असलेल्या या वादाबद्दल शिवसेना मंत्री आणि फडणवीस यांच्यात स्पष्टपणे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे. (Behind closed doors, Devendra Fadnavis’s kanmantra to Shiv Sena ministers; Said, we together…)
जाहिरातीमुळे चर्चांना उधाण
शिवसेनेच्या मंत्र्यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या गोष्टी कानावर पडतात त्याकडे दुर्लक्ष करा. कोणीही चिंता करायची गरज नाही. या गोष्टी होतच राहणार. सर्वांनी सर्वच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. (Mumbai News) आपण एकत्रच आहोत. युतीत खडा पडेल, असं कोणतंही वक्तव्य माध्यमांसमोर करू नका. आपण एकत्र आहोत, हीच आपली ताकद आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. विरोधक फोडाफोडीचे राजकारण करतच राहणार. हे कोणीही गांभीर्याने घेऊ नका.
दरम्यान, शिवसेनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपच्या वाढत्या दबावतंत्रावर सचूक वक्तव्य केलं. तसेच आमदारांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. (Mumbai News) किर्तीकर म्हणाले की, ४० आमदार एकत्र आले म्हणून भाजप पुन्हा सत्तेत आली. ४० आमदारांनी आपली ताकद ओळखणं गरजेचं आहे. तुम्ही सोबत होता म्हणूनच महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली. मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंना पायउतार केलं आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसवलं, असंही गजानन किर्तीकर म्हणाले. एनएससीआयमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये गजानन किर्तीकर बोलत होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर… मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!