Pune News : पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पुण्यातील पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची गैरसोय झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. कुलुपबंद शाळेमुळे अनेक वारकऱ्यांना आपली पथारी सोमवारी सकाळी पार्किंगच्या जागेत टाकावी लागली. ती जागा अपूरी असल्याने त्यांना मग शाळेकडे येणाऱ्या रस्त्यावरच पथारी टाकून बसावे लागले आहे. शाळा कुलुंपबंद व त्यांची किल्ली कोणाकडे तेच माहिती नाही असा हा प्रकार होऊनही सायंकाळपर्यंत त्याची कोणीच दखलच घेतलेली नव्हती. या प्रकारामुळे वारकऱ्यांची राहण्याची मोठी गैरसोय झालेली बघायला मिळाली आहे. शहरातील भवानी पेठ, रामोशी गेट जवळच्या सावित्रीबाई फुले प्रशालेत सोमवारी सकाळी हा प्रकार झाला. (Inconvenience of workers in Pune; Due to the locked school, the living conditions of the students)
भवानी पेठ, रामोशी गेट जवळच्या सावित्रीबाई फुले प्रशालेतील प्रकार
काही दिवसांपूर्वी भवानी पेठेत मोठी आग लागली होती. त्यात नेहमी वारकरी मुक्काम करत असत त्या रफी अहमद किडवाई शाळेचे बरेच नुकसान झाले. तेथील वर्गखोल्या खराब झाल्यात. (Pune News) याच शाळेत वारकऱ्यांना नेहमी मुक्काम होत असतो. मात्र ती खराब असल्याने सावित्रीबाई फुले प्रशालेत वारकऱ्यांना बोलावण्यात आले. मात्र तिथे शाळाच कुलुंबबंद होती. वारकऱ्यांना त्यांचे साहित्य वाहनतळाच्या जागेत ठेवण्यास सांगण्यात आले.
वारकरी मुक्कामी असलेल्या शाळेची किल्ली कोणाकडे आहे हे स्थानिक स्तरावरही कोणाला माहिती नाही. शिक्षण मंडळाकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी ही शाळा आमच्या ताब्यातच नाही असे सांगण्यात आले.
तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ
उद्योगनगरीचा पाहुणचार घेऊन श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी पुण्याकडे मार्गस्थ झाला. पिंपरी-चिंचवडकरांनी भक्तिभावाने पालखीला निरोप दिला. (Pune News) पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी;‘स्वारगेट-मंत्रालय’नवी हिरकणी सेवा सुरू
Pune News : आळंदी मधील ‘त्या’प्रकारापूर्वीचा व्हिडीओ आला समोर; नेमकं काय घडलं?