दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर, (पुणे) : पुणे सोलापूर महामार्गावर (Pune Solapur highway) काळेवाडी नं.२ (ता. इंदापूर) जवळ अज्ञात ( incident has taken) वाहनाने (unknown vehicle) दिलेल्या धडकेत अंदाजे ४ वर्ष (Four Year) वय असलेला नर जातीच्या बिबट्याचा (leopard died) जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता. ०२) संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेने उजनीकाठच्या ( farmers of Ujnikath) शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण (atmosphere) पसरले आहे. (Indapur News)
अधिकाऱ्यांनी केला मृत बिबट्याचा पंचनामा
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावर काळेवाडी नं.२ येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या ठार झाल्याची माहिती इंदापूर वन परिक्षेत्र अधिकारी अजित सुर्यवंशी, वनपाल गावटे, वनरक्षक सनी कांबळे, वनमजूर महादेव झोळ यांसह महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, पोलीस हवालदार उमेश लोणकर, पोलीस हवालदार भानुदास जगदाळे, पोलीस नाईक नितीन वाघ यांनी अपघात स्थळी भेट दिली. मृत बिबट्याचा पंचनामा केला असून मृत बिबट्याचे शव वन विभागाने पुढील तजविज कामी ताब्यात घेतले आहे.
मयत बिबट्याचे शवविच्छेदन करुन नियमानुसार अंत्यसंस्कार केले जातील, शिवाय बिबट्या मृत्यूप्रकरणी अज्ञात वाहन व अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला जाईल असं वन परिक्षेत्र अधिकारी अजित सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, करेवाडी, चितळकरवाडी या भागात बिबट्या पाहिल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले होते. इंदापूरच्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे शेतकरी मात्र चिंतातूर होताना दिसत आहे.
Indapur News : अखेर वानर जेरबंद : इंदापूर वनविभाग व रेस्कू टीमच्या चार तासांच्या अथक प्रयत्नांना यश
Indapur News : बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रास उत्कॄष्ट आरोग्य केंद्र पुरस्कार !