राजेंद्रकुमार गुंड
माढा : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळावेत. यासाठी विठ्ठलवाडी (ता. माढा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद बाजार’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७५ स्टॉल मधून विद्यार्थ्यांनी २२ हजार रुपयांच्या साहित्याची विक्री केली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुभाष लोखंडे यांनी दिली.
या आनंदी बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शितल गुंड यांच्या हस्ते व सरपंच संगीता अनिलकुमार अनभुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. तसेच व्यवहार ज्ञानाचे आकलन व्हावे, यासाठी शालेय स्तरावर आठवडे बाजार भरविला होता. यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या बाजारात स्टेशनरी दुकान, इडली सांबर,पाणीपुरी,ओली व सुखी भेळ, वडापाव, पावभाजी, गरमागरम चहा- कॉफी व भजी, मिसळपाव, पालेभाज्या व फळे, डिंकलाडू, बेसण लाडू, शेंगदाणा लाडू, शेंगदाणा चिक्की, मनुके, खारे शेंगदाणे, फरसाण खाऊचे स्टॉल, भाजी मंडई, स्टेशनरी, असे अनेक प्रकारचे स्टॉल लावले होते. खाद्यपदार्थांची विक्रीहि मोठ्या प्रमाणात झाली.
खरेदीसाठी सर्व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालक, महिला व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या वेळी विद्यार्थ्यांचे धाडस व योग्य प्रकारची देवाणघेवाण पाहून उपस्थितांनी सर्व विद्यार्थ्यांकडून वस्तू खरेदी करून सर्वांचे कौतुक केले.
यावेळी केंद्रप्रमुख विष्णू बोबडे, मुख्याध्यापक बाळू गुंड, अंकुश गवळी, विजय काळे, भारत कदम, गोरखनाथ शेगर, संजय सोनवणे, सुप्रिया ताकभाते, इंदूमती कदम, मेघना गुंड, स्वाती उबाळे, कांताबाई गुंड, माधुरी गुंड, सोनाली शेगर, पूजा कोकाटे, माधुरी सस्ते, तेजश्री गुंड, राधा खैरे, सुप्रिया शेंडगे, नेहा उबाळे, राणी काशीद, कैलास सस्ते, अशोक जाधव, दत्तात्रय खैरे, दत्तात्रय काशीद, गोपीनाथ मस्के, कैलास खैरे, वैजिनाथ जाधव, बबन उबाळे, शिरीष मस्के, हनुमंत मस्के, मुकुंद खैरे, नितीन शिंगाडे, अमोल गव्हाणे, विष्णू खैरे, महादेव जाधव यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.