Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार! हवामान विभागाचा रेड/यलो अलर्ट जारी; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 14 August 2026, 21:37

पुणे : राज्यातील अनेक भागांत सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसासह वादळी स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.

कोकणातील पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाण्यात मध्यम पावसाचा अंदाज असून, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. नाशिकच्या घाटमाथ्यावरही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे हलका ते मध्यम पाऊस, तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

 

विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

संपूर्ण विदर्भात वादळी पावसाची शक्यता असून, अमरावती, अकोला आणि बुलढाणा येथे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अमरावतीत काही ठिकाणी मुसळधार पाऊसही होऊ शकतो.

भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूरमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस, मेघगर्जना, वीज आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्ते आणि पुलांवरून पाणी वाहण्याची तसेच वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वातावरण निर्माण झाल्यास नागरिकांनी मोकळ्या मैदानात जाणे आणि झाडाखाली आश्रय घेणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘गे डेटिंग’ ॲपवर ओळख; पुण्यातल्या तरुणाला निर्जनस्थळी भेटायला बोलावलं अन् पडक्या खोलीत नेत तिघांचं भयानक कृत्य…

Saturday, 3 October 2026, 15:18

मिनाक्षी शिंदेंच्या अडचणी वाढल्या! पूर्णेकर हत्याकांडात चौकशीची टांगती तलवार; मोठी अपडेट समोर

Saturday, 3 October 2026, 15:03

IND vs PAK Asian Games 2026 Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम! फायनलमध्ये पाकिस्तानला १९ धावांनी धुडकावत टीम इंडियाने पटकावले सुवर्णपदक

Saturday, 3 October 2026, 14:58

सरकारचा शब्द कागदावरच; संगणक परिचालकांचे मानधन पुन्हा रखडले!

Saturday, 3 October 2026, 14:41

पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटला! महायुतीकडून भाजपने मारली बाजी; कौस्तुभ गावडे उमेदवारीच्या रिंगणात

Saturday, 3 October 2026, 14:41

बँकॉकहून पुण्यात आली भारतीय महिला; विमानतळावर संशयित हालचाली अन् बॅगेत ‘हेअर ट्रीटमेंट’ आणि स्क्रबचे डबे; झडती घेताच पोलिसही चक्रावले

Saturday, 3 October 2026, 14:34
Next Post

इंदापुरात तिरंगा मशाल रॅलीने स्वातंत्र्यदिनाचा जागर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp