Horoscope Today: आज गुरुवार (२० फेब्रुवारी) आहे. आज अनेक राशींवर मंगल-अमंगल परिणाम पाहायला मिळतील. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल असतील की प्रतकुल ? तुम्हाला आज कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला कोणत्या संधी मिळतील? आजचा दिवस कुटुंब, मित्र, आरोग्य,नातेसंबंध, व्यवसाय, आणि प्रेमासाठी कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य.

मेष रास: आजचा दिवस विपरीत परिणाम निर्माण करणारा आहे. कार्यालयातील कामाचा दबाव जास्त असेल त्यामुळे तुम्ही त्रस्त राहाल. आज कर्ज वाढू शकते. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ रास: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. तुम्ही नवीन योजना अंमलात आणाल. अनेक कामात गुंतल्याने चिंतेत असाल. तुमचे ध्येय साध्य होईल.आरोग्य उत्तम असेल.

मिथुन रास: आजचा दिवस चांगला आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ असेल. व्यवसायात फायदा होईल. मित्र भेटल्याने आनंदी असाल. तुम्हाला तुमच्या व्यवहारांशी संबंधित बाबींवर पूर्ण लक्ष द्यावे लागेल.
कर्क रास: कामाच्या ठिकाणी ताण असेल. आरोग्याची काळजी घ्या. आज घाईघाईने निर्णय घेऊ नका. निर्णय घेताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.
सिंह रास: या राशीच्या लोकांना आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. नेतृत्व क्षमतेत वाढ होईल. कुटुंब व भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. जमीन किंवा मालमत्तेसंबंधित वाद सुटेल.
कन्या रास: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चिंताजनक असेल. कामाच्या ठिकाणी चिंतेत असाल. आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक कार्यात तुम्ही योगदान द्याल.
तूळ रास: आजचा दिवस व्यस्त असणार आहे. रा राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने तुम्ही आनंदी असाल. सहकाऱ्यापासून सावधान रहा.
वृश्चिक रास: या राशीच्या लोकांनी सावधान राहावे. या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. मानसिक गोंधळामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. आज मोठी गुंतवणूक करू शकता.
धनु रास: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही असेल. तुमचा तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होत असेल तर तेही सोडवले जाईल. तुम्हाला कोणत्याही विनाकारण वादात पडणे टाळावे लागेल. मित्राला मदत कराल. त्यासाठी तुम्ही काही पैशांची व्यवस्था देखील करू शकता. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळेल.
मकर रास : आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायात फायदा होईल. तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. कौटुंबिक आनंदात असाल.
कुंभ रास: आजचा दिवस चांगला असेल. आरोग्याची काळजी घ्या. कोणतेही अवघड काम सहजपणे पूर्ण करण्यात मदत होईल. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला लाभ मिळतील. व्यवसायात फायदा होईल.
मीन रास: आजचा दिवस चांगला असेल. आज कर्जातुन बाहेर पडाल. व्यवसायात फायदा होईल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुम्हाला व्यवसायातही चांगले यश मिळेल. भागीदारीत कोणतेही काम सुरू केल्यास त्यात थोडी काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल.







