Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी; भाजपसह उद्धव ठाकरेंच्या पैलवानाला केले चितपट

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 4 June 2024, 17:07
Vishal Patil wins from loksabha constituency

सांगली: महाराष्ट्र राज्यात लोकसभेला ४८ मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होती. या निवडणुकीच्या निकालात राज्याने महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांनी कौल दिला आहे. तर महायुतीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून मोठा वाद रंगला होता. याठिकाणी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांना डावलून महाविकास आघाडीने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती.

शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये येऊन चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी नाराज झाले. त्याचे रुपांतर विशाल पाटील यांच्या बंडखोरीत झाले. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरोधात दंड थोपटले आणि त्यात ते विजयीही झाले आहेत. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे संजयकाका पाटील आणि मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला आहे.

विशाल पाटील यांना ५ लाख ५ हजार मते, संजयकाका पाटील यांना ४ लाख २० हजार मते तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ ५५ हजार मते पडली आहेत. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दोन्ही उमेदवारांचा मोठा पराभव केला. निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यापासूनचे विशाल पाटील यांनी आघाडी घेतली होती.

या विजयानंतर बोलताना विशाल पाटील म्हणाले की, अनेक काँग्रेस नेत्यांनी जाहीरपणे माझा प्रचार केला. दिवंगत नेते पतंगराव कदम यांना मानणारा मोठा गट हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. त्यांनीच मला मोठं मताधिक्य मिळवून दिले. तसेच आर.आर पाटील यांच्या मतदारसंघातही मला मताधिक्य असून त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत होते, असं देखील त्यांनी सांगितले.

 

पुढे बोलताना पाटील म्हणाले, हा विजय जनतेचा आहे. ज्या लोकांनी माझ्यासाठी काम केले, त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला गेला. या लोकांच्या पाठीशी ठामपणे मी उभा आहे. ज्यांनी मला मतदान केले नाही, त्यांच्याबाबत कोणताही आकस नाही. मी सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून लोकसभेत काम करणार आहे, असंही विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्कूल बसमध्ये चिमुकलीला एकटी पाहिलं अन् चालकाची नजर फिरली; नराधमाने 3 वर्षांच्या चिमुकलीवर केला अत्याचार

Friday, 4 September 2026, 9:34

‘महाराष्ट्राची वाघीण’ गेली! कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; 3 जणांचा मृत्यू, 1 जखमी

Friday, 4 September 2026, 9:13

‘1 लाख रुपये घेऊन ये’ म्हणत छळ! इंदापूरमध्ये 21 वर्षीय विवाहितेने केली आत्महत्या

Friday, 4 September 2026, 8:56

पुणे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 42 गाड्या रद्द, 25 गाड्यांचे मार्ग बदलले; गणेशोत्सवात मोठा मेगा ब्लॉक

Friday, 4 September 2026, 8:32

Maharashtra Weather: आज महाराष्ट्रावर पावसाचं संकट? ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार सरींची शक्यता

Friday, 4 September 2026, 8:21

Daily Horoscope: कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ‘या’ राशींचे भाग्य चमकणार! श्रीकृष्णाच्या कृपेने धनलाभ अन् मोठी खुशखबर?

Friday, 4 September 2026, 7:48
Next Post

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी; काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp