सोलापूर: सोलापूरच्या विजापूर नाका परिसरात (Shocking News) सामूहिक बलात्काराच्या तक्रारीने खळबळ उडवून दिलेल्या प्रकरणाला तपासादरम्यान अनपेक्षित (Solapur News) वळण मिळाले आहे. सुरुवातीला गंभीर (Crime News) गुन्हा म्हणून नोंद झालेली ही घटना प्रत्यक्षात बनावट असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले असून, तक्रार देणारी महिला आणि तिच्या प्रियकरालाच अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

18 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8:30 वाजता संबंधित महिलेने 112 वर फोन करून चार जणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. मात्र प्राथमिक तपासातच घटनाक्रमात अनेक विसंगती आढळू लागल्या, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
तपास पुढे नेताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि वैद्यकीय तपासणीचा आधार घेतला. यासोबतच महिलेच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली. या सर्व तपासातून कोणताही बलात्काराचा प्रकार घडल्याचे पुरावे समोर आले नाहीत. अखेर कठोर चौकशीनंतर महिलेनेच ही तक्रार खोटी असल्याची कबुली दिली.
या बनावामागचे कारणही तितकेच धक्कादायक आहे. महिलेच्या प्रियकरावर पूर्वी गंभीर गुन्हा दाखल होता आणि त्या प्रकरणातील फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी त्यांना अडकवण्याचा हा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. न्यायालयीन प्रक्रियेला वाकवण्यासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी गंभीर गुन्ह्याचा गैरवापर करण्यात आल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.







