Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, आमदार संजय शिंदे यांचे प्रतिपादन

सागर घरतby सागर घरत
Saturday, 9 March 2024, 15:04
Maharashtra Government supporting farmers says MLA sanjay Shinde karmala

करमाळा: 2023 च्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण राज्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून शेतकऱ्यांना दुष्काळाचे अनुदान मंजूर करणे, याबरोबरच चारा छावणी, पाणी टँकर याबाबत देखील शासनाने पावले उचलली असल्याचे प्रतिपादन आमदार  संजय शिंदे यांनी शुक्रवारी करमाळा येथील जनता दरबारामध्ये केले.

दुष्काळी परिस्थितीविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील 40 तालुके हे दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केलेले आहेत. या 40 तालुक्यांसाठी शासनाच्या 29 फेब्रुवारी 2024 च्या अध्यादेशाद्वारे शासनाने तब्बल 2 हजार 443 कोटी 22 लाख निधी मंजूर केला आहे. या सर्व तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून प्रशासनाने शासनाकडे याद्या पाठविलेल्या होत्या. त्या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळालेली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माढा या 5 तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुके म्हणून झालेला आहे. यामध्ये करमाळा तालुक्यासाठी 146 कोटी 94 लाख निधी मंजूर झाला आहे. लवकरच हा निधी महसुल विभागाच्या वतीने प्रत्येक खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे.

टँकर धोरणातही बदल…
पूर्वी एखाद्या गावात पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव व लोकप्रतिनिधींची शिफारस ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवल्यानंतर त्याला मान्यता दिली जात होती. परंतु, दुष्काळाची दाहकता ओळखून कागदपत्रे आणि प्रस्तावातील वेळ वाचावा, या हेतूने नवीन टँकर मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडून आता प्रांत कार्यालयाकडे आलेले आहेत. त्यामुळे एखाद्या गावाने टँकर मागणीचा प्रस्ताव प्रांत कार्यालयात दाखल केल्यानंतर आपल्याला फक्त मेसेज करावा. तो मेसेज आपण तात्काळ प्रांत यांच्याकडे पाठवत असून हीच शिफारस गृहीत धरून गावांना टँकर मंजूर केले जात आहेत, अशी माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली. चारा टंचाईचा आढावा घेऊन भविष्यकाळात त्या दृष्टीनेही सरकार निश्चितच पावले उचलेल, असेही ते म्हणाले.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18

दारूच्या पैशांसाठी जन्मदात्रीच ठरली बळी; मुलाने गळ्यावर वार करून आईला संपवलं,पुण्यात थरार!

Sunday, 30 August 2026, 18:46

पुण्यातील वाहतूक कोंडीवर अखेर मोठा उपाय; इनर रिंगरोडच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाचा सक्त कालबद्ध कार्यक्रम!

Sunday, 30 August 2026, 18:29

बदलापूरच्या दहीहंडीत दुर्घटना! सलामीदरम्यान सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा थेट खाली कोसळला

Sunday, 30 August 2026, 18:17

पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप! विद्यार्थ्यांचा संताप शिगेला, परीक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह

Sunday, 30 August 2026, 18:00
Next Post
MNS chief Raj Thackeray to hold rally for BJP candidate Muralidhar Mohol

मराठ्यांनो भूलथापांना बळी पडू नका, जी गोष्ट होऊच शकत नाही, त्याचे आश्वासन सरकार देतंय; राज ठाकरेंचा हल्लाबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp