Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेन्शन घेत होता, तरीही सुरू होता काळा धंदा! निवृत्त सरकारी डॉक्टरने 2 वर्षांत केले तब्बल 300 बेकायदेशीर गर्भपात

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 31 July 2026, 14:15

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. करवीर पोलिसांनी एका निवृत्त सरकारी डॉक्टरच्या रुग्णालयावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात या डॉक्टरने गेल्या 2 वर्षांत सुमारे 300 गर्भपात केल्याचे समोर आले असून, या प्रकरणामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरमध्ये आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला बेकायदेशीर गर्भपाताच्या रॅकेटची प्रकरणे समोर येत असल्याने चिंता वाढली आहे. अशा प्रकारच्या कारवायांमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव डॉ. चंद्रकांत गायकवाड असे आहे. ते आरोग्य विभागातून सहाय्यक संचालक पदावरून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतरही त्यांना नियमित पेन्शन मिळत असतानाही अधिक पैशाच्या मोहापोटी त्यांनी हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोप आहे.

 

काही दिवसांपूर्वी करवीर पोलिसांनी कळंबा परिसरातील एका लॉजवर छापा टाकून महिला एजंटांना अटक केली होती. चौकशीदरम्यान गर्भलिंग निदानानंतर गर्भपातासाठी महिलांना डॉ. गायकवाड यांच्या रुग्णालयात पाठवले जात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गुप्तपणे चौकशी सुरू केली.

संपूर्ण प्रकार उघड करण्यासाठी पोलिसांनी एका महिलेला बनावट रुग्ण म्हणून रुग्णालयात पाठवले. तपासादरम्यान डॉक्टरांनी कोणतीही अधिकृत नोंद न करता तिची तपासणी केली. त्यानंतर गर्भपातासाठी औषध देऊन पुढील प्रक्रिया सुरू केली. ठरलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकून डॉक्टरला ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी रुग्णालयातून सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे आणि शस्त्रक्रियेची विविध उपकरणे जप्त केली. प्राथमिक तपासात प्रत्येक गर्भपातासाठी 20 ते 25 हजार रुपये घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी छापा टाकल्यानंतर डॉक्टरांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले. रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांची औपचारिक अटक अद्याप झालेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास करवीर पोलीस करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे विद्यापीठाचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड! ७० हजार घेऊन दिली ‘बी.कॉम.’ची बोगस डिग्री; असं फुटलं घोटाळ्याचं बिंग

Friday, 31 July 2026, 15:27

सोन्याने पुन्हा घेतली उसळी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर; चांदी 2.20 लाखांच्या पार

Friday, 31 July 2026, 15:03

‘केवळ खासगी आस्थापनांनाच टार्गेट करणार का?” तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

Friday, 31 July 2026, 14:57

पुण्याच्या पर्यावरणाबाबत धोक्याची घंटा! प्रदूषणाने पुणेकर हैराण, महापालिकेच्या सर्वेक्षणातून चिंताजनक वास्तव आलं समोर

Friday, 31 July 2026, 14:38

साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, ‘तो’ भावनिक क्षण कॅमेरात कैद

Friday, 31 July 2026, 14:27

पेन्शन घेत होता, तरीही सुरू होता काळा धंदा! निवृत्त सरकारी डॉक्टरने 2 वर्षांत केले तब्बल 300 बेकायदेशीर गर्भपात

Friday, 31 July 2026, 14:15
Next Post

साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, 'तो' भावनिक क्षण कॅमेरात कैद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.