Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: तृतीयपंथीयाच्या खून प्रकरणातील 3 आरोपींना अवघ्या 6 तासाच्या आत अटक; सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 28 December 2025, 19:30
Crime News: 3 accused in transgender murder case arrested within just 6 hours; Performance of Solapur City Crime Branch

सोलापूर: घरातील सोन्याचे दागिने व रोख (Crime News) रक्कम चोरण्यासाठी तृतीयपंथीयाचा राहत्या घरी खून केल्याची घटना घडली होती. ही घटना सोलापूर शहरातील (Solapur News) पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे मुर्गी नाला (उत्तर) जवळ शनिवारी (ता.27) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली होती. या खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या 6 तासाच्या आत उलघडा करून 3 आरोपींना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. (Latest Breaking News)

 

अयुब हुसेन सय्यद असे खून झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. तर यशराज उत्तम कांबळे (वय-21, रा. इंदिरा नगर लातूर), आफताब इसाक शेख (वय-24, व्यवसाय मजुरी, रा. कुंभारवाडी ता. रेणापूर जि. लातूर) व वैभव गुरूनाथ पनगुले (रा. कुंभारवाडी ता. रेणापूर जि. लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिल्या माहितीनुसार, अयुब सय्यद याचा राहत्या घरी खून झाला होता. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे , पोलीस उप-आयुक्त (गुन्हे)डॉ. अश्विनी पाटील यांनी सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांना दिल्या होत्या. तांत्रिक माहितीच्या आधारे व सी.सी.टी. व्ही. फुटेजची तपासणी केली असता, पोलिसांना हा गुन्हा 3 इसमांनी मिळून केला आहे. व आरोपी हे लातूर जिल्ह्याचे दिशेने पळून गेल्याची खात्रीशीर दिसून आली. पोलिसांचे पथके तात्काळ लातूरकडे रवाना झाली. आणि आरोपींनी लातूर येथील विवेकानंद चौक येथील पाण्याचे टाकी जवळील परिसरातून अटक केली.

दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आफताब शेख व मयत अयुब सय्यद हे यापूर्वीपासूनच ओळखीचे असून आफताब शेख हा मयत अयुब सय्यद यास भेटण्याकरीता वारंवार सोलापूर येथे येत होता. त्यावेळी आफताब शेख यास अयुब सय्यद याच्याकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याची माहिती होती. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मयत अयुब सय्यद यास भेटण्याचा बहाणा करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरण्याचे उद्देशाने आरोपी यशराज कांबळे याच्याकडील युनिकॉर्न मोटार सायकल वरून सोलापूर येथे आले होते. आणि तिघांनी मिळून अयुब सय्यद याचा राहत्या घरी खून केला आणि घरातील सोन्या सारखे दिसणारे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन व दुचाकी चोरी करून नेली.

पोलिसांनी आरोपींना खाक्या दाखविताच आरोपींनी खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड ठोठावली आहे. तर गुन्हे शाखा व सदर बझार पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या 6 तासाच्या आत गुन्ह्याची उकल करून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरची कामगिरी सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे , पोलीस उप-आयुक्त (गुन्हे)डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, विजय पाटील, शैलेश खेडकर, दत्तात्रय काळे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, शामकांत जाधव, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, बापू साठे, अंकुश भोसले, संदिप जावळे, जावेद जमादार, अनिल जाधव, विनोद रजपूत, महेश शिंदे, वाजीद पटेल, योगेश बर्डे बुगड, काशिनाथ वाघे, राजकुमार वाघमारे, आबाजी सावळे, संजय साळुंखे, कुमार शेळके, घायगुडे, राजकुमार पवार, इम्रान जमादार, धिरज सातपुते, अजिंक्य माने, सैपन सय्यद, वसिम शेख, राजु मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, सतिश काटे, बाळासाहेब काळे, प्रकाश गायकवाड राठोड यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33

उरुळी कांचनमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळले, पीएमआरडीएकडून मालकावर गुन्हा दाखल

Thursday, 9 April 2026, 10:18

महिलांना नोकरी द्यायचे अन् नंतर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव? बड्या IT कंपनीतील धक्कादायक प्रकार

Thursday, 9 April 2026, 10:04

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागात मोठे फेरबदल; गोविंद येतयेकर आणि ओमप्रकाश चौहान यांच्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 9 April 2026, 9:57

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08
Next Post
Sharad Pawar: "We will not stop for anyone!" Sharad Pawar group's 'Plan C' ready for Pimpri-Chinchwad; Political excitement

Sharad Pawar: "आम्ही कोणासाठी थांबणार नाही!" पिंपरी-चिंचवडसाठी शरद पवार गटाचा 'प्लॅन C' तयार; राजकारणात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.