Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar: “आम्ही कोणासाठी थांबणार नाही!” पिंपरी-चिंचवडसाठी शरद पवार गटाचा ‘प्लॅन C’ तयार; राजकारणात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 28 December 2025, 19:38
Sharad Pawar: "We will not stop for anyone!" Sharad Pawar group's 'Plan C' ready for Pimpri-Chinchwad; Political excitement

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या (Sharad Pawar) राजकारणात मोठी खळबळ उडाली असून (Pune Politics) महाविकास आघाडीमध्ये बिघाडी (Ajit Pawar) झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. महाविकास (Pune Mahapalika Election) आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीकडे शरद पवार (Pune Election) गटाने पाठ फिरवल्याने आघाडीतील अस्वस्थता उघडपणे समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार गटाला थेट अल्टीमेटम दिला असून, आगामी निवडणुकांसाठी तीन पर्यायी प्लॅन जाहीर केले आहेत. (Latest Marathi News)

 

पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर पुणे शहरात शरद पवार गटाने महाविकास आघाडीला साथ दिली आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आतापर्यंत तीन सकारात्मक बैठका झाल्या असून, दोन्ही पक्षांतील काही नेते यासाठी अनुकूल असल्याची माहिती आहे.

एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चेत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अनुपस्थिती दर्शवली. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली असून, त्याचेच पडसाद या बैठकीत उमटल्याचे दिसून आले.

ना युती, ना आघाडी… शरद पवारांची नवी खेळी? पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

शरद पवार गटाची अनुपस्थिती पाहून सचिन अहिर यांनी थेट भूमिका घेत महाविकास आघाडीसाठी तीन पर्यायी प्लॅन तयार असल्याची घोषणा केली. त्यानुसार प्लॅन A अंतर्गत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल. प्लॅन B मध्ये शरद पवार गट सोबत न आल्यास उर्वरित मित्रपक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतील. तर प्लॅन C मध्ये ठाकरे सेना आणि मनसे युतीचा नवा पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सचिन अहिर यांनी आम्ही कोणासाठीही थांबणार नाही, अशा शब्दांत शरद पवार गटाला स्पष्ट इशारा दिला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना शिंदे गट सुरुवातीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास तयार होता, मात्र वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोंडीत पकडल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता शरद पवार गट यावर काय भूमिका घेतो आणि महाविकास आघाडीचे हे संकेत प्रत्यक्षात अंमलात येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Bollywood

Bollywood : धुरंधर ते हाऊसफुल ५: २०२५ मध्ये कोणत्या चित्रपटाने कमावले सर्वाधिक पैसे? पाहा टॉप १० ब्लॉकबस्टरची सविस्तर यादी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.