Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : सण साजरा करायला मामाच्या गावी आला पतंग उडवायला गच्चीवर गेला.. आणि १४ वर्षांच्या अर्णवचा जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 January 2026, 18:23
Crime

Crime : मकरसंक्रांतीचा आनंद साजरा करण्यासाठी पुण्याहून मामाच्या गावी आलेल्या १४ वर्षीय मुलावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात घडली. पतंग उडवताना उच्चदाब वीजवाहिनीचा धक्का लागून अर्णव महेश व्यवहारे या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा १९ वर्षीय मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संक्रांतीचा उत्साह क्षणात शोकात बदलला.

 

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात आज दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी फाटा परिसरात राहणारा अर्णव व्यवहारे हा मकरसंक्रांतीच्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी कोपरगाव येथे आपल्या मामा ओंकार काळे यांच्या घरी आला होता. संक्रांतीच्या दिवशी सकाळी अर्णव आपल्या मित्रांसोबत घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. त्याच्यासोबत ऋषिकेश वाघमारे (वय १९, रा. कोपरगाव) आणि इतर मित्रही उपस्थित होते.

पतंग उडवण्यासाठी बाइंडिंग तारचा वापर करण्यात आला होता. खेळाच्या नादात असताना अर्णवच्या हातातील तार घराशेजारी जाणाऱ्या हाय व्होल्टेज वीजवाहिनीच्या संपर्कात आली. जोरदार विद्युत धक्का बसताच अर्णव जागीच कोसळला. त्याला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या ऋषिकेशलाही विजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर अर्णवचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. ऋषिकेशवर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सणासाठी मोठ्या आनंदाने कोपरगावात आलेल्या अर्णवचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लक्ष्मीनगर परिसरासह संपूर्ण कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, पतंग उडवताना धोकादायक तारांचा वापर टाळावा आणि वीजवाहिन्यांजवळ विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या खिशाला चटका! CNG च्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; जाणून घ्या नवे दर

Friday, 3 April 2026, 8:34

पोलीस ठाण्यातच ‘डील’! आरोपीला अटक न करण्यासाठी चक्क 3 लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकाला लाच घेताना पकडले रंगेहाथ

Friday, 3 April 2026, 8:23

70 कोटींची माया अन् 100 खात्यांचा एकच वारसदार; अशोक खरातच्या बेनामी साम्राज्याचा पर्दाफाश

Friday, 3 April 2026, 8:13

Pune News: खेळता खेळता धावून आला काळ! उघड्या पाण्याच्या टाकीने हिरावले एका कुटुंबाचे सुख; नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 3 April 2026, 8:07

Pune Weather: पावसानंतर आता उन्हाचा चटका वाढणार; पुण्यात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Friday, 3 April 2026, 7:33

Daily Horoscope: कुटुंब, करिअर आणि आरोग्य; 3 एप्रिल 2026 चे संपूर्ण राशीभविष्य एका क्लिकवर

Friday, 3 April 2026, 7:25
Next Post
KL Rahul Century Celebration

KL Rahul Century Celebration : राजकोटमध्ये केएल राहुलचा जलवा; टीम इंडियाचा सन्मानजनक स्कोअर! पाहा अनोखं सेलिब्रेशन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.