Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: त्या रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्या अन् तो शिव्या देत राहिला; किरकोळ वाद अन् पठ्ठ्याचं दारूच्या नशेत शेजारणीसोबत भयंकर कृत्य…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 28 December 2025, 15:24
Crime News: She collapsed in a pool of blood and he kept cursing her; Minor dispute and Pattha's horrific act with a drunk neighbor...

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील उमरेड (Crime News) शहरात काल शनिवारी दुपारी (Nagpur News) घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गांगापूर (Nagpur Crime) कालवा परिसरातील झोपडपट्टीत (Umred News) दारूच्या नशेत असलेल्या शेजाऱ्याने किरकोळ वादातून माय-लेकींची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत पार्वता शंकर फुकट (वय 65) आणि त्यांची मुलगी संगीता वसंता रिठे (वय 40), दोघीही गांगापूर, उमरेड येथील रहिवासी असून घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी नितेश किसन ठाकरे (वय 31), रा. गांगापूर झोपडपट्टी, उमरेड याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. (Latest Marathi News)

दारूचं व्यसन अन् वारंवार वाद

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नितेश ठाकरे आणि मृतक माय-लेकी शेजारीच राहत होते. नितेशला दारूचे व्यसन असून तो नशेत असताना परिसरातील लोकांशी वारंवार वाद घालत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही आरोपी आणि मृतकांमध्ये अनेकदा वाद झाले होते. काल शनिवारी दुपारी सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास मृतकांच्या घरासमोर नितेश ठाकरे आणि पार्वता फुकट यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद काही वेळातच तीव्र झाला.

लाकडी दांडक्याने मारहाण

वादाच्या भरात दारूच्या नशेत असलेल्या नितेशने जवळच असलेला लाकडी दांडा उचलून पार्वता फुकट यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. आईवर हल्ला होत असल्याचे पाहून मुलगी संगीता रिठे आईला वाचवण्यासाठी मध्ये पडली. मात्र आरोपीने तिच्याही डोक्यावर लाकडी दांड्याने वार केले. या हल्ल्यात दोघीही रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

 

परिसरात खळबळ

घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी फिर्यादी स्मिता पंकज जुमडे (वय 36) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे उमरेड शहरासह संपूर्ण नागपूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post

2025 Viral Trends: चॅटजीपीटीची 'घिबली' स्टाईल अन् जेमिनीचा 'साडी' अवतार! २०२५ मध्ये AI ने लावलंय वेड; बघा यावर्षीचे ट्रेंड्स

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.