Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘वहिनी आहेत ना…’ टॅगलाईनसह सुनेत्रा पवारांचे राज्यभरात दौरे; नाशिक अधिवेशनात मोठी घोषणा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 16 September 2026, 15:13

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. ‘वहिनी आहेत ना…’ या टॅगलाईनच्या माध्यमातून पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलेल्या सहकाऱ्यांशी संवाद साधून पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत भूमिका आणि धोरणे ठरविण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून केला जाणार आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर राज्य सरकारमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही आली. सरकारमधील कामकाजासोबतच पक्षसंघटनेकडेही लक्ष राहावे, यासाठी त्यांनी राज्यभर दौरा करावा, अशी सूचना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार नाशिक अधिवेशनानंतर त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या राज्यव्यापी नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे आणण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. ‘वहिनी आहेत ना…’ या टॅगलाईनद्वारे कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेतृत्वाकडून सहकार्य मिळेल, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतीसमोर अडचणी निर्माण झाल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीचा दौरा करून सुनेत्रा पवार अधिकाऱ्यांसह आढावा घेणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यावरही या दौऱ्यात भर दिला जाणार आहे.

 

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता दूर करून संघटनेला सक्रिय करण्याचाही प्रयत्न या दौऱ्यातून केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून पक्षसंघटना मजबूत करण्यासह सुनेत्रा पवार यांचा राज्यातील जनसंपर्क वाढविण्यावर भर राहणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंबईत रुग्णालयात अग्नितांडव! गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; 2 कर्मचारी होरपळले

Wednesday, 16 September 2026, 16:09

बाबीर देवस्थानच्या विकासाला मिळणार मोठं बळ? 100 एकर वनजमीन आणि ‘ब’ दर्जासाठी डॉ. आकाश कांबळेची उपमुख्यमंत्री पवांराकडे मागणी

Wednesday, 16 September 2026, 15:26

‘वहिनी आहेत ना…’ टॅगलाईनसह सुनेत्रा पवारांचे राज्यभरात दौरे; नाशिक अधिवेशनात मोठी घोषणा

Wednesday, 16 September 2026, 15:13

1033 हेल्पलाइन होणार ‘स्मार्ट’; अपघातस्थळी मदत वेगाने पोहचणार

Wednesday, 16 September 2026, 15:01

‘मला मुंबईत जाऊन मरू द्या’; जरांगें पाटलांचा भावनिक टाहो, सरकार काय निर्णय घेणार?

Wednesday, 16 September 2026, 14:44

चॉकलेट खाल्ल्यानंतर काही वेळातच मृत्यू! 23 वर्षीय तरुणीसोबत नेमकं काय घडलं? वाचा

Wednesday, 16 September 2026, 14:41
Next Post

बाबीर देवस्थानच्या विकासाला मिळणार मोठं बळ? 100 एकर वनजमीन आणि ‘ब’ दर्जासाठी डॉ. आकाश कांबळेची उपमुख्यमंत्री पवांराकडे मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp