डॉ. अशोक बालगुडे :

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी मुंबईकडे कूच केली आहे. प्रकृती खालावल्याने भावनिक झालेल्या जरांगे यांनी, “मला मुंबईत जाऊन मरू द्या,” अशी आर्त विनवणी केली.

आंतरवली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाला 19 दिवस पूर्ण झाले आहेत. प्रकृती खालावल्याने डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, मुंबईतील आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“समाजाच्या कल्याणासाठी एक बळी द्यावाच लागेल. समाजाच्या लेकरांसाठी मी बळी द्यायला तयार आहे,” असे जरांगे यांनी सांगितले. पाटोद्यात समर्थकांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्याला गोळ्या घालून ठार करण्याचे षडयंत्र रचल्याचा दावा जरांगे यांनी केला. या दाव्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची परवानगी दिलेली नाही. आता जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजात चितेंचे वातावरण पसरले आहे. यावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






