Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दारूने घेतला भावजयीचा जीव…! नशेत दिराने केला ‘सविता’चा निर्घृण खून; अहमदनगरमध्ये खळबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 4 August 2024, 18:25

अहमदनगर : अहमदनगरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र कुटूंबात राहणाऱ्या दिराने दारूच्या नशेत जबर मारहाण करून सख्खा भावजयीचा निर्घण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना राहाता शहरातील १५ चारी हद्दीत घडली आहे. सविता लहानू पवार (वय-४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राहाता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी बबन गोविंद पवार याला अवघ्या काही तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहाता शहरातील १५ चारी हद्दीत प्रकाश जगताप यांच्या पेरूच्या शेतामध्ये आदिवासी समाजाचे पवार कुटुंबिय बाभळीची झाडे तोडून भट्टी लावून कोळसा बनविण्याचे काम करीत होते. पाथर्डी येथील ठेकेदार नारायण सोमा राठोड हे कामगार पुरवठादार आहेत. शुक्रवार आठवडे बाजार असल्याचे कारण देत बबन पवारसह इतरांनी पगाराची रक्कम घेतली. त्यानंतर रात्री दारूच्या नशेत बबन पवार याचे व मृत सविता पवार या दोघा दिर भावजयीमध्ये भांडण झाले.

या भांडणांमध्ये दिराने भावजयीच्या डोक्यासह कानशिलाजवळ जबर मारहाण केली. यामध्ये सविताचा मृत्यू झाला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी (शनिवारी) सकाळी शेजारील व्यक्ती त्यांना उठविण्यासाठी आले असता सविता मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाची चक्रे फिरवित आरोपी बबन पवार याला काही तासांच्या आत ताब्यात घेतले. दरम्यान, सविताच्या डोक्यासह कानशिलाजवळ गंभीर इजा तर छातीवर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे करीत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Trimbakeshwar

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांना गंडा! 3 हजारांची फसवणूक; एकाला बेड्या, तर दुसरा फरार

Monday, 13 April 2026, 18:08
shikrapur

shikrapur : मंगळसूत्र लूट प्रकरणातील आरोपीला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Monday, 13 April 2026, 17:50

आशा भोसलेंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाचा मोठा निर्णय; पुण्यात आज सायंकाळी हृदयनाथ मंगेशकर करणार मोठी घोषणा

Monday, 13 April 2026, 17:49

Loni Kalbhor Crime: कुंजीरवाडीत पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 17:31
Next Post

यवत येथील श्री महालक्ष्मी माताची आषाढ यात्रेची सात काढत सांगता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.