Saturday, February 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: मित्राच्या पत्नीबद्दलच्या चुकीच्या कमेंट अन् संताप अनावर, भररस्त्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या; अवघ्या 2 तासांत आरोपी अटकेत!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 February 2026, 13:59

Crime News: नाशिक: मित्राच्या पत्नीबद्दल काढलेले चुकीचे उद्गार एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरातील पिंपळगाव डुकरा येथे शुक्रवारी मध्यरात्री मैत्रीला काळिमा फासणारा हा प्रकार घडला. केवळ रागाच्या भरात एका मित्राने दुसऱ्या मित्राचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Murder) केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला अवघ्या 2 तासांत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल एकनाथ गिन्हे हे आपल्या ओळखीच्या अजय रंगनाथ पवार याच्यासोबत होते. त्यावेळी अनिल याने अजयच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्याच्या वागण्यामुळे अजय आणि त्याच्या पत्नीला मोठा राग आला. या प्रकाराची माहिती अजयची पत्नी काजल हिने आपल्या बहिणीला फोन करून दिली आणि परिस्थिती गंभीर होऊ शकते, असेही सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर अजय खूप संतापला होता. रागाच्या भरात त्याने अनिल याच्यावर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. काही वेळाने कुटुंबातील सदस्य घटनास्थळी पोहोचले असता अनिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. हा प्रकार पाहून सर्वजण हादरले.

घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू करून संशयित अजय पवार याला अवघ्या 2 तासांत ताब्यात घेतले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे एकाचा जीव गेला आणि एकाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime News: मित्राच्या पत्नीबद्दलच्या चुकीच्या कमेंट अन् संताप अनावर, भररस्त्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या; अवघ्या 2 तासांत आरोपी अटकेत!

Saturday, 21 February 2026, 13:59

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालाला 15 दिवस उलटले तरी अध्यक्ष-सभापती निवडीचा पत्ता नाही; सदस्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता

Saturday, 21 February 2026, 13:56

लोणी स्टेशन चौकात भरधाव कारने महिलेला उडवले; चालकावर गुन्हा दाखल

Saturday, 21 February 2026, 13:23

कदमवाकवस्तीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा खोटा कॉल; अज्ञातावर गुन्हा दाखल

Saturday, 21 February 2026, 13:08

Indapur : रमजानची मेजवानी! ‘या’ खास रबडी आणि खिचड्याची चव चाखण्यासाठी होतेय गर्दी; दर ऐकून व्हाल थक्क!

Saturday, 21 February 2026, 13:01

उरुळी कांचनच्या उन्नती कन्या विद्यालयात कराटे यलो बेल्ट परीक्षेचा उत्साह

Saturday, 21 February 2026, 12:49
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.