नाशिक: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे महादेवाचे मंदिर उभारून स्वतःची (Ashok Kharat) ओळख निर्माण करणारा अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ अनेक वर्षांपासून ज्योतिष आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून प्रभाव वाढवत होता. संसारातील अडचणी, अपत्यप्राप्ती, नोकरीतील प्रगती किंवा राजकीय भविष्य अशा विविध कारणांनी (Nashik News) लोक त्याच्या दरबारात येत होते. विशेषतः पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी (Sinnar News) त्याच्या पूजांना मोठी गर्दी होत असे, ज्यामध्ये श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींचाही समावेश होता. (Latest Marathi News)

नाशिक हे धार्मिक विधी आणि दोषनिवारणासाठी प्रसिद्ध असल्याने, त्याचाच आधार घेत खरातने ‘सर्पपूजा’सारख्या विधींचा प्रभावी देखावा उभा केला. दरबारात भक्त जमल्यानंतर तो ध्यानस्थ झाल्यासारखा अभिनय करत असे आणि काही वेळात त्याच्या आसपास मोठा नाग दिसत असल्याचे दृश्य निर्माण केले जात असे. समोर उभा ठाकलेला नाग पाहून अनेक भक्त घाबरून जायचे, तर काहींवर मानसिक परिणामही होत असल्याच्या चर्चा होत्या. या अनुभवामुळे खरातकडे दैवी शक्ती असल्याचा समज अधिक पक्का होत गेला.
मात्र, सुरू असलेल्या तपासात या कथित चमत्कारामागील वास्तव उघड होऊ लागले आहे. समोर दिसणारा नाग खरा नसून, कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कातडीसारखा देखावा देऊन तयार केलेला बनावट नाग आणि त्यावर रिमोट कंट्रोलद्वारे हालचाली करून भक्तांना भ्रमात ठेवले जात होते, अशी माहिती समोर येत आहे.







